अभिनेत्री सारा खान पुन्हा अडकली लग्नबंधनात
मुंबई, 8 ऑक्टोबर, (हिं.स.)। टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री सारा खान, जी ‘बिदाई’ मालिकेतील साधना या भूमिकेमुळे घराघरात ओळखली जाते. हिने पुन्हा एकदा आयुष्याचा नवा अध्याय सुरू केला आहे. साराने अभिनेता आणि निर्माता कृष पाठकसोबत कोर्ट मॅरेज
सारा


मुंबई, 8 ऑक्टोबर, (हिं.स.)। टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री सारा खान, जी ‘बिदाई’ मालिकेतील साधना या भूमिकेमुळे घराघरात ओळखली जाते. हिने पुन्हा एकदा आयुष्याचा नवा अध्याय सुरू केला आहे.

साराने अभिनेता आणि निर्माता कृष पाठकसोबत कोर्ट मॅरेज करून आपल्या नात्याला अधिकृत मान्यता दिली आहे.

दोघांनी खासगी समारंभात लग्न केलं असून, ५ डिसेंबर २०२५ रोजी पारंपरिक आणि भव्य सेलिब्रेशनसोबत रिसेप्शन आयोजित करण्यात येणार आहे.

साराने म्हणाली, “ही आमच्या आयुष्यातील सर्वात सुंदर सुरुवात आहे. कृष माझा फक्त पार्टनर नाही, तर माझा आधार आहे.”

फॅन्सकडून या नवदांपत्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे.

--------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande