पाणंदरस्ते अतिक्रमण मुक्त करण्यासाठी मोहीम स्तरावर काम करा - जिल्हाधिकारी
अकोला, 8 ऑक्टोबर (हिं.स.)।नागरिकांचे प्रलंबित प्रश्न सुटावेत व त्यांना उत्तम सेवा मिळावी यासाठी सेवा पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले. हा उपक्रम केवळ या कालावधीपुरता मर्यादित न राहता सातत्यपूर्ण कार्य करावे. पानंदरस्ते अतिक्रमण मुक्त करण्यासाठी स्तराव
P


अकोला, 8 ऑक्टोबर (हिं.स.)।नागरिकांचे प्रलंबित प्रश्न सुटावेत व त्यांना उत्तम सेवा मिळावी यासाठी सेवा पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले. हा उपक्रम केवळ या कालावधीपुरता मर्यादित न राहता सातत्यपूर्ण कार्य करावे. पानंदरस्ते अतिक्रमण मुक्त करण्यासाठी स्तरावर काम करावे असे निर्देश जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी अकोट येथे दिले. जिल्हाधिकाऱ्यांनीतहसील कार्यालय अकोट व उपविभागीय अधिकारी कार्यालय अकोट येथे भेट देऊन कार्यालयाची पाहणी केली. कार्यालयामध्ये नागरिकांच्या माहितीसाठी लावण्यात आलेले विविध क्यू आर तसेच इतर माहिती फलक याबाबत पाहणी करून माहिती जाणून घेतली. त्याचप्रमाणे सेवा पंधरवड्यामध्ये केलेल्या कामकाजाचा आढावा घेतला. उपविभागीय अधिकारी मनोज लोणारकर यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व तालुकास्तरीय व उपविभाग स्तरीय अधिकारी यांची आढावा सभा घेऊन त्यांच्या विभागामार्फत केल्या जाणाऱ्या विविध कामकाजाची माहिती घेतली, तसेच ग्रामीण रुग्णालय अकोट येथे भेट देऊन रुग्णालयामार्फत नागरिकांना पुरविल्या जाणाऱ्या विविध वैद्यकीय सेवांची पाहणी केली. जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्याधिकारी अकोट यांचे कार्यालयात भेट देऊन नगरपरिषद कामकाजाबाबत आढावा घेतला. नगरपरिषद मार्फत नागरिकांना पुरविल्या जाणाऱ्या अत्यावश्यक सेवा योग्य दर्जाचे असाव्यात तसेच शहराचे सौंदर्यीकरण करण्याबाबत निर्देश दिले. त्यांनी मौजे जीतापूर येथील स्वयंचलित पर्जन्यमापक यंत्र चे ठिकाणी भेट देऊन पाहणी केली व परिसरातील शेतकऱ्यांच्या याबाबत असलेल्या तक्रारी जाणून त्या सोडवण्याचे निर्देश दिले. जिल्हाधिकारी श्रीमती मीना यांनी मौजे बोर्डी येथे जनसंवाद कार्यक्रमांमध्ये उपस्थित राहून नागरिकांच्या तक्रारी व समस्या जाणून घेतल्या व सदर समस्या सोडविण्यासाठी संबंधित सर्व विभागांचे अधिकारी यांना निर्देश दिले.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande