अकोला, 8 ऑक्टोबर (हिं.स.)।
प्रत्येक दिव्यांग व्यक्तीला समानतेने,सन्मानाने जगण्याचा आणि समाजाच्या सर्व क्षेत्रांत पूर्ण सहभाग घेण्याचा अधिकार असून प्रत्येक दिव्यांगाला समान संधी देणे व त्यांच्या हक्कांचे संरक्षण करणे प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम यांनी येथे केले. जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयाच्या वतीने आयोजित दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ कलम ३९ अन्वये दिव्यांगांप्रती संवेदनशिलता जागृती कार्यशाळेत त्या बोलत होत्या.
यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.आरती कुलवाल,उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिगंबर लोखंडे,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बळीराम गाढवे,जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी डॉ.तुषार जाधव,महिला बालविकास अधिकारी राजश्री कोलखेडे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी माया शिर्के,पोलिस अधीक्षक कार्यालयाचे पि.एन उलेमाले,सहायक लोक अभिरक्षक ॲड.अक्षय डोंगरे आदी उपस्थित होते.
कार्यशाळेची सुरुवात दीप प्रज्वलन व लुईस ब्रेल, हेलन केलर यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. यावेळी स्व.कनुबाई वोरा अंध विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केले.कार्यशाळेमध्ये विविध विभागाच्या वतीने दिव्यांगाचे हक्क,अधिकार, योजनांबद्दल माहिती देण्यात आली.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे