अकोला, 8 ऑक्टोबर (हिं.स.)। सध्या सणासुदीचे दिवस सुरू असल्याने शहरातील प्रमुख रस्त्यांवर किरकोळ व्यापाऱ्यांनी फेरी लावून व्यापार सुरू केला आहे. मात्र या व्यापाऱ्यांमुळे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. रहदारी सुरळीत ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून वारंवार रिक्षाचालक आणि किरकोळ व्यापाऱ्यांना अडथळा निर्माण न करण्याच्या सूचना दिल्या जात आहेत.दरम्यान,अकोला महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी मोहिमेदरम्यान एक नाट्यमय प्रसंग घडला. अतिक्रमण हटविण्यासाठी आलेल्या पथकासोबत असलेल्या पोलिस अधिकाऱ्यानं सोबत एका दुकानदाराचा वाद झाला. पोलिस मारहाण करण्याची भाषा करीत असल्याचा आरोप करीत संतप्त दुकानदाराने कपडे काढून निषेध नोंदवला. या घटनेमुळे परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.अतिक्रमण मोहिमेदरम्यान झालेल्या या प्रकारामुळे व्यापाऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे