सोनम वांगचूक यांच्या अटकेच्या निषेधातील र्कँडल मार्चची चौकशी व्हावी – हिंदू राष्ट्र समन्वय समिती
अकोला, 8 ऑक्टोबर (हिं.स.)। हिंदू राष्ट्र समन्वय समिती’ तर्फे आज जिल्हाधिकारी वर्षा मीना यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात लडाखमधील सोनम वांगचूक यांच्या अटकेच्या निषेधार्थ अकोल्यात ४ ऑक्टोबर रोजी काढण्यात आलेल्या केंडल मार्च संदर्भात चौकशी करण्
प


अकोला, 8 ऑक्टोबर (हिं.स.)। हिंदू राष्ट्र समन्वय समिती’ तर्फे आज जिल्हाधिकारी वर्षा मीना यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात लडाखमधील सोनम वांगचूक यांच्या अटकेच्या निषेधार्थ अकोल्यात ४ ऑक्टोबर रोजी काढण्यात आलेल्या केंडल मार्च संदर्भात चौकशी करण्याची मागणी करण्यात आली.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, सोनम वांगचूक यांना लेह-लडाखमधील हिंसक आंदोलनानंतर राष्ट्रीय सुरक्षा कायद्यान्वये (एनएसए) अटक करण्यात आली आहे. त्यांच्या संस्थांवर विदेशातून प्राप्त निधीचा गैरवापर होत असल्याच्या आरोपांवरून सीबीआय चौकशी सुरू आहे. अशा परिस्थितीत अकोल्यात त्यांच्या समर्थनार्थ काढण्यात आलेला मार्च संशयास्पद असल्याचे समितीने म्हटले आहे.समितीच्या मते, “लेह-लडाखसारख्या दूरवरच्या भागातील घटनेवरून अकोल्यात निषेध मार्च काढणे हे विचार करण्यासारखे आहे. कोणत्या अदृश्य शक्ती या संघटनांना प्रेरणा देत आहेत? हे उघड व्हावे,तसेच चौकशी करण्याची ” मागणी समितीने केली.

यासोबतच समितीने प्रशासनाकडे पुढील मुद्द्यांवर त्वरित चौकशीची मागणी केली आहे —

१. दूरवरच्या प्रदेशातील घडलेल्या घटनेचा निषेध करणाऱ्या या संघटनांना कोणी अदृश्य हात साह्य करत असतील तर त्या संदर्भात चौकशी व्हावी.

२ मार्च मध्ये सहभागी झालेल्या संघटनांचा हेतू उघड होईल या दृष्टीने चौकशी करण्यात यावी.

3. मार्च काढण्याचे आणि त्या निमित्ताने राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचे कोणाचे कुटिल हेतू असतील तर त्यांना लगेचच पायबंद घालण्याचा विचार व्हावा.

४.राज्याच्या बाहेरून किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावरून असे काहीप्रयत्न होत आहेत का या संदर्भातही चौकशी व्हावी.

५ अन्य गावांमध्ये राज्यांमध्ये हे राष्ट्रद्रोही लोण पसरू नये या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना कराव्या.

६.चौकशीअंती कुटिल हेतू निष्पन्न झाल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी.

संजय ठाकूर, प्रमोद अग्निहोत्री, दीपक पुरी, नंदकिशोर मेहरे, अजय खोत, संजय केंदळे, राजेश क्षीरसागर, तसेच राष्ट्रभक्त अधिवक्ता समितीच्या दीपाली जानोरकर आणि श्रुती भट निवेदन देताना उपस्थित होते.जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी निवेदन स्वीकारले असून, संबंधित विषयावर योग्य ती चौकशी करण्याचे आश्वासन दिले.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande