अकोला, 8 ऑक्टोबर (हिं.स.)। सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश भूषण गवई यांच्यावर दोन दिवसांपूर्वी न्यायालयात कथितपणे बूट भिरकावण्याच्या घटनेचा अकोला जिल्हा बार असोसिएशनने तीव्र निषेध व्यक्त केला आहे. ही घटना न्यायव्यवस्थेचा अवमान करणारी असून देशाच्या इतिहासातील “काळा दिवस” असल्याचे बार असोसिएशनने म्हटले आहे.या घटनेविरोधात अकोल्यातील वकिलांनी कामबंद आंदोलन करत जिल्हाधिकाऱ्यामार्फत राष्ट्रपतींना निवेदन सादर केले.आरोपी वकिलावर देशद्रोहासह सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्याची मागणी संघटनेने केली आहे. तसेच ही कृती पूर्वनियोजित कटकारस्थान असल्याचा संशय व्यक्त करत घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणीही करण्यात आली आहे.या निषेधामुळे न्यायालयीन कामकाज दिवसभर ठप्प राहिले. बार असोसिएशनने न्यायव्यवस्थेच्या प्रतिष्ठेचे रक्षण करण्यासाठी सर्व वकिलांनी एकजूट दाखवावी, असे आवाहन केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे