नंदुरबार - ॲङ धर्मपाल मेश्राम यांनी घेतला विविध विभागाचा आढावा
नंदुरबार, 8 ऑक्टोबर (हिं.स.) महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोगाचे उपाध्यक्ष तथा सदस्य ॲङ धर्मपाल मेश्राम यांनी जिल्ह्यातील नगपालिका, नगरपरिषद, समाज कल्याण, पोलीस विभाग तसेच महिला व बाल कल्याण आदि प्रशासकीय विभागाचा आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकार
नंदुरबार - ॲङ धर्मपाल मेश्राम यांनी घेतला विविध विभागाचा आढावा


नंदुरबार, 8 ऑक्टोबर (हिं.स.) महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोगाचे उपाध्यक्ष तथा सदस्य ॲङ धर्मपाल मेश्राम यांनी जिल्ह्यातील नगपालिका, नगरपरिषद, समाज कल्याण, पोलीस विभाग तसेच महिला व बाल कल्याण आदि प्रशासकीय विभागाचा आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी, जिल्हा नियोजन अधिकारी शंशाक काळे, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त, सुंदरसिंग वसावे, नगर पालिका प्रशासन जिल्हा सहआयुक्त जमीर लेंगेरकर, नगरपालिकेचे मुख्याधिकारी राहूल वाघ (नंदुरबार), मयुर पाटील (नवापूर), विक्रम जगदाडे (तळोदा), हर्षल सोनवणे (धडगांव), साजिद

पिंजारी (शहादा), आदि विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी बैठकीस उपस्थित होते.

उपाध्यक्ष ॲङ मेश्राम यांनी यावेळी जिल्ह्यातील नगरपालिका, नगरपरिषदा तसेच जिल्हा परिषद व समाज कल्याण यांना मिळणाऱ्या महसूलाचे 5 टक्के निधी आस्थापना खर्च, वजा खर्च, आर्थिक दुर्बल घटकावर केलेल्या खर्चाचे मागील 5 वर्षांचा आढावा, नागरी दलित वस्ती, रमाई आवास घरकुल योजना, लाड पागे प्रलंबित प्रकरणे व अनुकंपा तत्त्वावरील प्रकरणे तसेच अनुसूचित जाती जमातीसाठी प्राप्त होणाऱ्या निधीबाबत आढावा घेवून नगरपालिका, नगरपरिषद हद्दीतील साफसफाई, घनकचरा व्यवस्थापन तसेच जिल्ह्यातील अनुकंपा तत्वावरील प्रकरणे त्वरीत निकाली काढण्याबाबत आवश्यक त्या सूचना संबंधितांना त्यांनी यावेळी दिल्या.

पोलीस विभाग, समाज कल्याण विभाग, महिला व बाल कल्याण विभाग जिल्हा परिषद, तसेच क्रीडा विभाग यांच्याकडून जिल्ह्यातील अनुसूचित जातीच्या ॲट्रोसिटी कायद्याअंतर्गत झालेल्या गुन्ह्याबाबत व अनुसूचित जाती यांच्यासाठी मिळालेला निधी याबाबत सविस्तर आढावा घेऊन अनुसूचित जातीच्या लोकांना शासकीय योजनांचा लाभ जास्तीत जास्त पोहचविण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी प्रयत्न करावा, असे निर्देश उपाध्यक्ष तथा सदस्य ॲङ मेश्राम यांनी यावेळी दिले.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande