छत्रपती संभाजीनगर, 8 ऑक्टोबर, (हिं.स.)। हिंगोलीत असलेल्या जलेश्वर तलावात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाला असून, यावर्षी देखील परंपरेनुसार पुढील 5 वर्षासाठी जलेश्वर तलाव १४ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता जाहीर लिलावाद्वारे ठेक्याने देण्यात येणार आहे.
त्यानुसार सर्व्हे क्र. 03 जलक्षेत्र 13 हेक्टर जलेश्वर तलावाची मत्स्य व्यवसायासाठी माहे ऑक्टोबर 2025 ते ऑक्टोबर 2030 पर्यंत या 5 वर्षे कालावधीसाठी हिंगोली तहसील कार्यालयात दि. 14 ऑक्टोबर, 2025 रोजी सकाळी 11 वाजता लिलाव घेण्यात येणार आहे.
या तलावासाठी उच्चतम बोली असलेल्याचा लिलाव अंतिम करण्यात येईल. या लिलावात केवळ नोंदणीकृत संस्था, खासगी व्यक्तींना भाग घेता येईल. यासाठी दि. 13 ऑक्टोबरपर्यत हिंगोली तहसील कार्यालयात कार्यालयीन वेळेत अर्ज दाखल करता येईल. प्राप्त अर्जाची छाननी दि. 14 ऑक्टोबर रोजी करण्यात येणार असून अर्जाची छाननी झाल्यानंतर लगेच प्रत्यक्ष लिलाव हिंगोली तहसील कार्यालयात होणार आहे. या ठेक्याची आधारभूत किंमत 2 लाख 48 हजार 625 आहे. तर अनामत रक्कम 25 हजार रुपये असणार आहे.
याबाबतच्या अटी व शर्ती तहसील कार्यालय हिंगोली व सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय हिंगोली यांच्या कार्यालयात वाचनासाठी नोटीस बोर्डावर डकविण्यात आले असल्याची माहिती तहसीलदार, हिंगोली यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis