नाशिक, 8 ऑक्टोबर (हिं.स.)। भारतीय जनता पक्ष प्रणित भाजपा कायदा आघाडी नाशिक महानगरच्या वतीने कायदा आघाडीचे ॲड. निलेश पाटील यांच्या पुढाकाराने सातपूर येथे पदग्रहण सोहळा व भव्य प्रवेश कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाशिक पश्चिमच्या आमदार सौ. सीमा हिरे होत्या. तसेच नाशिक भाजपचे अध्यक्ष सुनील नाना केदार यांच्यासह विविध मान्यवर, पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी अनेक नव्या कार्यकर्त्यांनी भाजपा कायदा आघाडीत अधिकृत प्रवेश केला.
भाजपा कायदा आघाडीने सर्वसामान्य जनतेसाठी जनहित कक्ष व विधी विभाग स्थापन केला असून, या माध्यमातून राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजनांची माहिती व लाभ नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य केले जाईल. तसेच पक्षाच्या कार्यकर्त्यांवर आंदोलन, धरणे यामध्ये झालेल्या पोलीस व कोर्ट केसेससाठी कायदेशीर मदत मोफत देण्यात येणार असल्याची माहिती आमदार सौ.सीमा हिरे यांनी दिली.
याशिवाय कायदा आघाडीच्या वतीने जनजागृतीसाठी मोफत कायदेविषयक शिबिरे आयोजित केली जाणार असून, केंद्र शासनाच्या विधेयकांमध्ये होत असलेल्या सुधारणांविषयी मार्गदर्शनही करण्यात येणार आहे.
या भव्य कार्यक्रमात अनेक नविन कार्यकर्त्यांनी भाजपा कायदा आघाडीत जाहीर प्रवेश केला. त्यांचे पक्षात स्वागत करताना आमदार सौ. सीमाताई हिरे म्हणाल्या, भाजप हा केवळ राजकीय पक्ष नाही, तर तो सामाजिक बांधिलकी असलेली चळवळ आहे. कायदा आघाडीमुळे पक्ष अधिक बळकट होणार आहे.नाशिक शहर भाजप अध्यक्ष सुनील केदार यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करत, पक्ष संघटनेला अधिक बळकट करण्याचे आवाहन केले.
या प्रसंगी ,प्रदीप पेशकर,अॅड.शाम बडोदे,डॉ वैभव महाले,नारायण जाधव,रामहरी संबेराव, अॅड निलेश पाटील,शरद फाडोल,ॅड.महेंद्र शिंदे,यशवंत पवार,राहुल निफाडे,गौरव सोनवणे,बाळा आहिरे,अॅड अतुल लोंढे,अॅड महेश पाटील, अॅड योगेश आहेर,अॅड भास्कर मेढे अॅड महेश आहेर,अॅड सर्वर्थ बूब, अॅड सचिन काळे,अॅड शशी जाधव अॅड प्रभाकर घुमरे,अॅड काजल गुप्ता,अॅड वैष्णवी शर्मा,अॅड पूजा जाधव आदी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV