छ.संभाजीनगर : 13 ऑक्टोबर रोजी भूमी लोक अदालतीचे आयोजन
छत्रपती संभाजीनगर, 8 ऑक्टोबर (हिं.स.)। भूमी अभिलेख विभागातील अर्धन्यायीक स्वरुपाचे कामकाज चालते. तथापि सदरचे विविध टप्यावर प्रलंबित असलेल्या अर्धन्यायीक प्रकरणांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने सदर प्रकरणांत संबंधितांना न्यायदानास विलंब होत आहे
छ.संभाजीनगर : 13 ऑक्टोबर रोजी भूमी लोक अदालतीचे आयोजन


छत्रपती संभाजीनगर, 8 ऑक्टोबर (हिं.स.)।

भूमी अभिलेख विभागातील अर्धन्यायीक स्वरुपाचे कामकाज चालते. तथापि सदरचे विविध टप्यावर प्रलंबित असलेल्या अर्धन्यायीक प्रकरणांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने सदर प्रकरणांत संबंधितांना न्यायदानास विलंब होत आहे. तरी विविध टप्यााेवर प्रलंबित असलेल्या अर्धन्यायीक प्रकरणांचा जलद गतीने निपटारा करण्यासाठी भूमि लोक अदालत 13 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता भूमी अभिलेख प्रशिक्षण प्रबोधिनी, गणेश कॉलनी, छत्रपती संभाजीनगर येथे करण्यात आले आहे.

भूमी लोक अदालतीमध्ये आपली प्रकरणे तडजोडीने मिटवावीत, असे आवाहन असे उपसंचालक, भूमि अभिलेख, छत्रपती संभाजीनगर यांनी कळविले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande