कोल्हापूर, 8 ऑक्टोबर (हिं.स.)।
येथील भारत राखीव बटालियन क्रमांक तीनचा तत्कालीन समादेशक खुशाल विठ्ठल सपकाळे (रा. मरोळ, मुंबई) हा बटालियनच्या कोल्हापुरातील कार्यालयात लाच घेताना सापडला होता. त्यानंतर सुरु असलेल्या त्याच्या चौकशीत त्याने नोकरी करताना पगारापेक्षा ७५.९८ टक्के जादा म्हणजेच एक कोटी ६६ लाख ३३ हजार ९९१ रुपयांची अपसंपदा मिळवल्याचे स्पष्ट झाले. याबाबत सपकाळे याच्यासह त्याची पत्नी हेमांगी यांच्यावर लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
एप्रिल २०१७ मध्ये बटालियनच्या कोल्हापुरातील कार्यालयात तो लाच घेताना सापडला होता. त्यानंतर त्याची चौकशी सुरू होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, एप्रिल २०१७ मधील कारवाईत भारत राखीव बटालियनचे तत्कालीन समादेशक सपकाळेसह सहा जणांना अटक झाली होती. त्यानंतर लाचलुचपत प्रतिवचना विभागाच्या अधीक्षकांनी सपकाळे याच्या मालमत्तेची खुली चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार उपअधीक्षक वैष्णवी पाटील यांनी चौकशी पूर्ण केली. चौकशीअंती सपकाळे याच्याकडे त्याचा पगार आणि अन्य अधिकृत स्रोतांपेक्षा ७५.९८ टक्के जास्त म्हणजे एक कोटी ६६ लाख ३३ हजार ९९१ रुपयांची अपसंपदा असल्याचे स्पष्ट झाले.
याबाबत उपअधीक्षक पाटील यांनी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी सपकाळे दाम्पत्यावर गुन्हा दाखल केला. पुणे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अपर पोलिस अधीक्षक अर्जुन भोसले अधिक तपास करीत आहेत. सपकाळे सध्या सेवानिवृत्त आहेत.
सपकाळे हा मुंबईत बसून बटालियनचा कारभार पाहत होता. आठवड्यातून एखादा दिवस येऊन तो कर्मचारी आणि दुय्यम अधिका-यांना कारवाया करण्याची भीती घालत होता. भरतीत त्याने कोट्यवधी रुपये उकळल्याची चर्चा आहे.
कर्मचारी भरतीत त्याने कोट्यवधी रुपये उकळल्याची चर्चा आहे. त्यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या चौकशीतून तो सुटला होता. मात्र, लाच प्रकरणात अडकल्याने त्याची अपसंपदा समोर आली. त्यावेळी घेतलेली पोलिस भरती आणि वर्ग चारच्या त्यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या चौकशीतून तो सुटला होता. मात्र, लाच प्रकरणात अडकल्याने त्याची अपसंपदा समोर आली. आणि सपकाळे पती पत्नीवर गुन्हा दाखल झाला.
---------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar