छ. संभाजीनगर - जिल्हाप्रशासन देणार शेतकऱ्यांना ‘हात मदतीचा’
छत्रपती संभाजीनगर, 8 ऑक्टोबर, (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगरजिल्ह्यात शेतकरी आत्महत्याग्रस्त व अतिवृष्टीमुळे बाधीत झालेल्या शेतकरी कुटुंबांना आधार देण्यासाठी ‘हात मदतीचा’ हा उपक्रम दि.११ ते १५ ऑक्टोंबर दरम्यान राबविण्यात येईल, असे जिल्हाधिकारी दिलीप स
Q


छत्रपती संभाजीनगर, 8 ऑक्टोबर, (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगरजिल्ह्यात शेतकरी आत्महत्याग्रस्त व अतिवृष्टीमुळे बाधीत झालेल्या शेतकरी कुटुंबांना आधार देण्यासाठी ‘हात मदतीचा’ हा उपक्रम दि.११ ते १५ ऑक्टोंबर दरम्यान राबविण्यात येईल, असे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी निर्देश दिले आहेत.यासंदर्भात आदेशही निर्गमित केले आहेत.

आत्महत्याग्रस्त शेतकरी तसेच अतिवृष्टीग्रस्त शेतकरी यांना मदत व्हावी यासाठी हे अभियान दि.१० ते १५ ऑक्टोंबर या कालावधीत राबविण्यात येईल. बाधीत कुटुंब ज्या योजनेंतर्गत मदतीसाठी पात्र ठरतील त्यांतर्गत मदत देण्यात येईल. तसेच जे पात्र ठरत नाहीत अशा कुटुंबांना स्वयंसेवी संस्था, संघटना यांच्या माध्यमातून मदत देण्यात येईल.

त्यासाठी दि.११ रोजी स्वयंसेवी संस्था, खाजगी संस्था, संघटना यांच्यासमवेत बैठक घेऊन मदतीचे नियोजन करण्यात येईल. दि.१४ व १५ ऑक्टोंबर रोजी तालुकास्तरावर कार्यक्रम घेऊन मदत धनादेश, मंजूरी आदेश इ. चे वाटप करण्यात येईल. दि.११ रोजी पात्र कुटुंबाकडुन अर्ज भरुन घेणे, कागद पत्रे भरुन घेतील. ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी, कृषी सहाय्यक यांनी ही पूर्तता करतील. दि.१३ ऑक्टोंबर रोजी अपूर्ण कामे पूर्ण करणे व मंजूरी देणे, धनादेश, मंजूरी आदेश तयार करणे, दि.१४ व १५ ऑक्टोंबर रोजी तहसिल कार्यालयात मदत वाटप कार्यक्रम आयोजीत करुन मदत वाटप करण्यात येईल. मदत वाटपाचे कार्यक्रम साध्या स्वरुपात असावे,अशी सुचनाही देण्यात आली आहे.

याप्रमाणे कालबद्ध कार्यक्रम देण्यात आला असून शेतकरी आत्महत्याग्रस्त व अतिवृष्टीग्रस्त शेतकरी कुटुंबांना ऐन सणाच्या आधी हा मदतीचा हात दिला जाणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande