जालना, 8 ऑक्टोबर (हिं.स.)।
जालना कृषी उत्पन्न बाजार समितीला जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी भेट देवून पाहणी केली
जालना जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी आज जालना येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजार पेठेतील फळे व भाजी मार्केटला प्रत्यक्ष भेट देवून येथील सोयी-सुविधांची पाहणी केली. यावेळी बाजार परिसराच्या पाहणी दरम्यान फळे व भाजीपाला मार्केट परिसराची दररोज स्वच्छता करून इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणेबाबत संबंधिताना सूचना दिल्या.
यावेळी पाहणी दरम्यान अपर जिल्हाधिकारी रिता मैत्रेवार, कृषी उपसंचालक संजय कायंदे, बाजर समितीचे प्रशासक परमेश्वर वरखडे आणि सचिव भरत तनपुरे आदी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis