नाशिकमध्ये काँग्रेसची उत्तर महाराष्ट्र विभागीय बैठक संपन्न
नाशिक, 8 ऑक्टोबर (हिं.स.)। - महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने उत्तर महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांची बैठक नाशिक रोड येथील उत्सव मंगल कार्यालयात होणार असल्याची माहिती नाशिक शहर काँग्रेसचे अध्यक्ष आकाश छाजेड यांनी दिली आहे. या बैठकीबाबत माहि
नाशिकमध्ये काँग्रेसची उत्तर महाराष्ट्र विभागीय बैठक संपन्न


नाशिक, 8 ऑक्टोबर (हिं.स.)। - महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने उत्तर महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांची बैठक नाशिक रोड येथील उत्सव मंगल कार्यालयात होणार असल्याची माहिती नाशिक शहर काँग्रेसचे अध्यक्ष आकाश छाजेड यांनी दिली आहे.

या बैठकीबाबत माहिती देताना शहर काँग्रेसचे अध्यक्ष आकाश छाजेड यांनी सांगितले की, आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्या सकाळपासून जिल्हा वार पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे या बैठकीमध्ये निवडणुकीच्या तोंडावर पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून आगामी काळात निवडणुकीला सामोरे जाताना काँग्रेस पक्ष मजबुतीने सामना करेल या दृष्टीने मान्यवरांचे मार्गदर्शन पदाधिकाऱ्यांना होणार आहे.

सर्वप्रथम नाशिक शहर त्यानंतर मालेगाव शहर, धुळे, नंदुरबार, अहिल्यानगर, जळगाव अशा स्वरूपात पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. या बैठकीला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, ज्येष्ठ काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, सचिव बीएम संदीप, खासदार शोभाताई बच्छाव, खासदार गोवाल पाडवी, गणेश पाटील, प्रदेश उपाध्यक्ष सचिन सावंत, आमदार शिरीष चौधरी, हेमंत ओगले, उपाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, जिल्हा अध्यक्ष शिरीष कोतवाल, प्रभारी सरचिटणीस ब्रिज किशोर दत्त, सह प्रभारी प्रदेश सचिव श्रुती म्हात्रे, उपाध्यक्ष शरद आहेर, सचिव राहुल दिवे, ज्ञानेश्वर गायकवाड, गटनेते शाहू खैरे, तसेच जिल्ह्यातील जेष्ठ काँग्रेस नेते सर्व ब्लॉक अध्यक्ष, सर्व तालुका अध्यक्ष, सर्व ब्लॉक अध्यक्ष, व सर्व विभाग, आघाड्यांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande