नवी मुंबई, 8 ऑक्टोबर (हिं.स.) - आज मुंबईचे दीर्घ प्रतीक्षित स्वप्न साकार झाले. विमानतळाला एशियातील एक महत्त्वाचा कनेक्टिव्हिटी हब बनवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच भाग म्हणून ट्रान्सपोर्टची सर्व माध्यमं मेट्रो, रस्ते, जलसेवा विमानतळाला जोडणं हाच याचा केंद्रबिंदू आहे आणि हे एक मल्टीमॉडल कनेक्टिव्हिटीचे उदाहरण ठरेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटन कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांनी भारताच्या विकासाच्या स्वप्नाला नव्या गतीने पंख देणारा एक महत्त्वाचा टप्पा पार केल्याचे सांगितले. यावेळी मोदींनी भाषणात केंद्र, राज्य व खाजगी भागीदारीने केलेल्या व्यवस्थापनावर आनंद व्यक्त केला.
मोदींनी खास करून युवकांना संदेश दिला की, हा काळ तुमच्यासाठी आहे, अशा संधी तुम्ही हाताळाव्यात. महाराष्ट्रातील आयटीआय आणि तांत्रिक संस्थांमध्ये नवीन अभ्यासक्रम सुरू झाले आहेत. ज्याद्वारे विद्यार्थी आधुनिक तंत्रज्ञान आणि कौशल्य शिकण्यास सक्षम होतील. यावेळी ते लोकनेते दि.बा. पाटील यांच्या कार्याचा स्मरण करून त्यांच्या प्रेरणादायी कार्याची आठवण केली.
विमानतळासाठी लागणारी खर्च संकल्पना, सुविधा आणि तंत्रज्ञानावर मोदी यांनी भर दिला. प्रथम टप्प्यातील ₹ 19,650 कोटींच्या गुंतवणुकीचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, हे विमानतळ जागतिक दर्जाचे असेल. उद्घाटनसोबतच मुंबई मेट्रो लाइन-3 चा अखेरचा टप्पाही मोदी यांनी सुरू केला, तसेच पहिले एकात्मिक मोबिलिटी अॅप ‘मुंबई वन’चे अनावरण केले. तसेच स्वदेशीचा वापर केला पाहिजे असे म्हणाले.
मोदींच्या मते, विकसित भारताचं स्वप्न हे या विमानतळात परावर्तित आहे. त्यांनी या प्रकल्पातील संधींचा उपयोग रोजगार निर्मितीसाठी होण्याची अपेक्षा व्यक्त केली आणि स्थानिक युवकांना अधिकाधिक संधी मिळाव्यात, असे आवाहन केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके