- ज्योतिरादित्य सिंधिया यांनी सादर केला भारताचा दूरसंचार रोडमॅप
नवी दिल्ली, 8 ऑक्टोबर (हिं.स.)। भारताच्या महत्वाकांक्षा आता केवळ 5-जीपर्यंत मर्यादित नाहीत, तर आता लक्ष 6-जी आणि उपग्रह संचारावर आहे. असे केंद्रीय संचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी सांगितले पुढे ते म्हणाले की आता उद्दिष्ट 6-जी पेटंटमधील 10 टक्के हिस्सा मिळवण्याचे आहे.
इंडिया मोबाइल काँग्रेस 2025 ला संबोधित करताना केंद्रीय संचार मंत्री सिंधिया म्हणाले की भारताचा क्रांतिकारी डिजिटल प्रवास हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाचे प्रतीक आहे. मोदींनी दूरसंचार क्षेत्राला राष्ट्रीय विकासाच्या केंद्रस्थानी ठेवले आहे.त्यांनी पुढे सांगितले की आशियातील सर्वात मोठ्या दूरसंचार आणि तंत्रज्ञान कार्यक्रम इंडिया मोबाइल काँग्रेस 2025 च्या उद्घाटनासह राष्ट्र केवळ डिजिटल क्रांतीत सहभागी होत नाही, तर देशासाठी उपाय तयार करून, स्थानिक आव्हानांना उत्तर देऊन आणि जागतिक स्तरावर नवकल्पनांना चालना देऊन त्याचे नेतृत्वही करत आहे.
ज्योतिरादित्य सिंधिया यांनी यावर भर दिला की भारत आता केवळ तंत्रज्ञान स्वीकारणारा देश राहिला नाही, तर जागतिक मानके ठरवणारा एक सक्रीय नवोन्मेषक बनला आहे. ते म्हणाले की तो दिवस दूर नाही, जेव्हा जग म्हणेल की जग भारतावर अवलंबून आहे. त्यांनी उद्योगजगताला आवाहन केले – “इथे डिझाइन करा, इथे उपाय तयार करा आणि सर्वत्र विस्तार करा.”पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील यशोभूमी येथे आशियातील सर्वात मोठा दूरसंचार, मीडिया आणि तंत्रज्ञान कार्यक्रम इंडिया मोबाइल काँग्रेस (आयएमसी) 2025 च्या नवव्या आवृत्तीचे उद्घाटन केले. या प्रसंगी पंतप्रधान मोदी म्हणाले की भारत हे गुंतवणूक, नवोन्मेष आणि उत्पादनासाठी सर्वात उत्तम ठिकाण आहे. त्यांनी सांगितले की भारताचे लोकशाही रचना, सरकारचा सकारात्मक दृष्टिकोन आणि व्यवसायासाठी अनुकूल वातावरण यामुळे देश गुंतवणूकदारांसाठी आकर्षक ठिकाण बनला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule