नाशिक विमानतळ येथे विमान पार्किंग हब विकसित करा; मंत्री भुजबळ यांचे पत्र
नाशिक, 8 ऑक्टोबर, (हिं.स.)। राज्य शासनाच्या विमानतळांना इंटरलिंक करण्याच्या धोरणांतर्गत नाशिक विमानतळावर विमान पार्किंग हब विकसित करण्यात यावे, अशी मागणी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणव
नाशिक विमानतळ येथे विमान पार्किंग हब विकसित करा, मंत्री भुजबळ यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र


नाशिक, 8 ऑक्टोबर, (हिं.स.)। राज्य शासनाच्या विमानतळांना इंटरलिंक करण्याच्या धोरणांतर्गत नाशिक विमानतळावर विमान पार्किंग हब विकसित करण्यात यावे, अशी मागणी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली.

नाशिक शहराची भविष्यातील विमानसेवेची वाढती गरज पाहता विमानतळाची उड्डाणक्षमता वाढविण्यासाठी 'एचएएल' ने नाशिक विमानतळ येथे सध्या अस्तित्वात असलेल्या धावपट्टीला समांतर नवीन धावपट्टी मंजूर केली असून ३४३ कोटींची निविदा दि. ९ जून रोजी प्रसिद्ध केली आहे. प्रयागराज येथील कुंभमेळ्याचा अनुभव लक्षात घेता, याच धर्तीवर नाशिक येथे विमान पार्किंग हब विकसित करणे गरजेचे असल्याचे पत्रकात नमूद करण्यात आले आहे. तसेच, मुंबई आणि दिल्लीसारख्या मोठ्या विमानतळांवर जागेची कमतरता भासत आहे. त्यामुळे विमान कंपन्यांना त्यांची विमाने पार्किंगसाठी इतरत्र पाठवावी लागतात. परिणामी इंधन खर्चात २० ते ३० टक्के वाढ आणि वेळेचा अपव्यय होतो. मुंबईपासून १५८ किमी हवाई अंतरावर असलेल्या नाशिक विमानतळावर पार्किंग हब विकसित केल्यास कुंभमेळा २०२७ नियोजन अंतर्गत मुंबईची विमाने पार्किंगसाठी नाशिक येथे पार्क करून अतिरिक्त कनेक्टिव्हिटीसह नवीन मार्ग सुरू करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande