अमरावती, 8 ऑक्टोबर (हिं.स.)। धामणगाव नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ साठी प्रभागनिहाय आरक्षण जाहीर करण्यात आले. नगर परिषद सभागृहात पार पडलेल्या सोडतीद्वारे आरक्षण निश्चित करण्यात आले असून, विविध प्रवर्गासाठी जागांचे वाटप करण्यात आले आहे. प्रभाग १ अ ओबीसी, ब महिला ओपन, २ अ अनुसूचित जाती महिला, ब सर्वसाधारण, ३ अ ओबीसी महिला, ब सर्वसाधारण, ४ अ ओबीसी महिला, ब सर्वसाधारण, ५ अ ओबीसी महिला, ब सर्वसाधारण, ६ अनुसूचित जाती, ब सर्वसाधारण महिला, ७अ सर्वसाधारण महिला, ब सर्व साधारण महिला, ८ अ ओबीसी, ब सर्व साधारण महिला, ९ अ एसटी महिला, ब सर्वसाधारण, १० अएससी महिला, ब सर्वसाधारण महिला असे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. आता निवडणुकीकडे नागरिकांचे लक्ष लागले असून, विविध राजकीय पक्ष, उमेदवार प्रचाराची तयारीला लागणार आहे. ही सोडत उपविभागीय अधिकारी तेजश्री कोरे, न. प. मुख्याधिकारी पूनम कळंबे, विविध पक्षांचे पदाधिकारी, पत्रकार, पोलीस प्रशासन यांच्या उपस्थितीत काढण्यात आली.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी