परभणी, 8 ऑक्टोबर (हिं.स.)। कै. सौ. कमलताई जामकर महिला महाविद्यालय, परभणी येथील एम. ए. संगीत विषयाची अंतिम वर्षाची विद्यार्थिनी कु. दिक्षा पद्माकरराव साळवे हिने स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड उन्हाळी २०२५ या परीक्षेत एम.ए.संगीत विषयात विद्यापीठातून तृतीय येण्याचा बहुमान पटकाविला.
तिच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष हेमंतराव जामकर, उपाध्यक्ष ॲड. किरणराव सुभेदार, कोषाध्यक्ष डॉ. अभयराव सुभेदार, सचिव विजयराव जामकर, सहसचिव डॉ. संजयराव टाकळकर, संस्थेचे सर्व संचालक, प्रभारी प्राचार्य डॉ. संगीता आवचार आणि सर्व प्राध्यापकांनी अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी दिक्षा साळवे यांना शुभेच्छा दिल्या.
दिक्षा साळवे यांच्या या यशा साठी संगीत विभाग प्रमुख डॉ. रवींद्र इंगळे, डॉ.पल्लवी कुलकर्णी यांचे मार्गदशन लाभले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis