छत्रपती संभाजीनगर, 8 ऑक्टोबर (हिं.स.)।
हिंगोली जिल्ह्यात सध्या पाऊस थांबला असल्यामुळे येलदरी, सिद्धेश्वर आणि पैनगंगा प्रकल्पातून आजही विसर्ग घट करण्यात आली आहे.
बुलडाणा जिल्ह्यातील खडकपुर्णा प्रकल्पातून पुर्णा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग थांबला असून, येलदरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस थांबला आहे. त्यामुळे येलदरी धरणाच्या विद्युत निर्मिती केंद्रातून २७०० क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. तर धरणाच्या मुख्य व्दारातून विसर्ग पूर्णत: बंद करण्यात आला आहे. तसेच सिद्धेश्वर धरणात १०० टक्के जिवंत पाणीसाठा झाला असून, या धरणातून विनाव्दार सांडव्यातून १२१० व मुख्य व्दारातून ६५७९ विसर्ग पुर्णा नदीपात्रात सुरू आहे.
ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्प, इसापूर धरणात जयपूर बंधा-यातून येणारा येवा कमी होत असल्यामुळे धरण पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी आज सांडव्याचे ३ दरवाजे १० सेंटीमिटरने सुरू आहेत. या ३ दरवाजातून केवळ १०३५ क्युसेक्स विसर्ग पैनगंगा नदीपात्रात सोडण्यात येत आहे.
धरणात येणा-या पाण्याची आवक अथवा घट करण्यात येईल. तरी गावातील नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन पूर नियंत्रण कक्षाकडून करण्यात आले आहे
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis