मुंबई, 8 ऑक्टोबर (हिं.स.)। अंमली पदार्थ तस्करीच्या एका प्रकरणात अंमलबजावणी संचालनालय (ईडी) च्या पथकाने बुधवारी मुंबईत आठ ठिकाणी छापे टाकले. छाप्यांचे अधिकृत तपशील ईडीने जाहीर केलेले नाहीत.
ईडीच्या सूत्रांनी बुधवारी सांगितले की, ईडीच्या पथकाने अंमली पदार्थ तस्करी करणारा फैसल जावेद शेख आणि त्याची सहकारी अल्फिया फैसल शेख यांच्यासह इतर तस्करांशी संबंधित आठ ठिकाणी छापे टाकण्यास सुरुवात केली. कथित अंमली पदार्थ तस्करीच्या नेटवर्कमधील मनी लाँड्रिंगच्या चौकशीच्या संदर्भात मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायदा (पीएमएलए), २००२ च्या तरतुदींनुसार हे छापे टाकण्यात आले. ईडीच्या सूत्रांनुसार, आतापर्यंतच्या छाप्यांमधून असे दिसून आले आहे की अंमली पदार्थ तस्करी करणारा फैसल जावेद शेख त्याचा पुरवठादार, कुख्यात ड्रग्ज किंगपिन सलीम डोला, जो अनेक कायदा अंमलबजावणी संस्थांना बराच काळ हवा होता, त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात सिंथेटिक ड्रग एमडी (मेफेड्रोन) खरेदी करत होता. तथापि, ईडीने या संदर्भात कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule