अमरावती, 8 ऑक्टोबर (हिं.स.) तालुक्यातील शेतकऱ्यांचे ज्वारीचे दोन कोटी रुपये शासनाकडे थकीत असून सदर रक्कम शेतकऱ्यांना तत्काळ द्यावी, अशी मागणी ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे.३ हजार ३७० रू. प्रति क्विंटल याप्रमाणे शासकीय हमीभावावर तालुक्यातील ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांची ज्वारी शासनाने खरेदी केली. मात्र ११ जून २०२५ पासून शासनाने १३० शेतकऱ्यांच्या खात्यात ज्वारीची रक्कम जमा केली नाही
शेतकऱ्यांच्या मालाची खाजगी व्यापाऱ्यांकडून आर्थिक लूट होऊ होऊ नये नये म्हण म्हणून शासनाने ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांकडून हमीभावावर ज्वारी खरेदीचे धोरण ठरवले. चांगला भाव मिळेल, या आशेने शेतकऱ्यांनी ज्वारी शासनाला विकली. सदर शासकीय खरेदी ही तालुका खरेदी-विक्री संस्थेच्या माध्यमातून करण्यात आली. खरेदी विक्री संस्थेने सर्व सोपस्कार पूर्ण केले. त्यामुळे सदर दोन कोटी रुपये शेतक-यांच्या बँक खात्यात जमा होणे गरजेचे होते. मात्र पाच महिन्यांचा कालावधी उलटूनही शेतकऱ्याना अद्याप रक्कम मिळाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी खरेदी-विक्री संस्थेत अनेक वेळा चकरा मारल्या. त्या अनुषंगाने संस्थेने अनेक वेळा अमरावती येथील जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांना पैशाची केली. वारंवार संस्थेकडून पाठपुरावाही मागणी करण्यात आलाः मात्र तरीसुद्धा कुठलाच फायदा झाला नाही सद्यस्थितीमध्ये सततच्या पावसामुळे शेतकरी अतिशय संकटात सापडला आहे. पावसामुळे सोयाबीनला कोंब फुटले आहे, संत्रा फळे जमीनदोस्त झाली आहे, कपाशीला बोंडे नाहीत, मोठ्या प्रमाणात पातीगळ झाली आहे. कुठल्याच कृषी मालाला भाव नाही, अशा अनेक संकटांनी शेतकऱ्याला घेरलेले आहेत.शेतकऱ्यांनी बँका आणि खाजगी सावकारांकडून कर्ज घेतली आहे. कर्जाचा भार शेतकऱ्यांच्या डोक्यावर दिवसेंदिवस वाढत आहे; मात्र शेतकऱ्यांच्या हक्काचे पैसे शासन देत नसल्याने या संकटात अधिकच भर पडली आहे.दिवाळी तोंडावर आहे. दिवाळीपूर्वी शासनाने ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांचे पैसे द्यावे, अशी मागणी आहे, अन्यथा शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात होणार असल्याच्या शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या आहे.
याबाबत अचलपूरच्या खरेदी-विक्री संस्थेचे व्यवस्थापक संतोष चित्रकार म्हणाले की,या संदर्भात जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालयाला पैसे पाठविण्याबाबत मागणी केली आहे. शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरच पैसे टाकले जाईल, असे जिल्हा मार्केटिंग कार्यालयाने सांगितले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी