अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ न्याय मिळावा : जिल्हाप्रमुख संजय चौगुले
कोल्हापूर, 8 ऑक्टोबर (हिं.स.)। राज्यात गेल्या काही दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तरी या शेतकऱ्यांना त्वरित न्याय द्या. अशा मागणीचे निवेदन शिवसेना (ठाकरे गट)च्या वतीने तहसीलदार सुशीलकुमार बेल्हेकर यांच्यामार्फत
शिवसेना (ठाकरे गट)च्या वतीने तहसीलदार सुशीलकुमार बेल्हेकरयांना निवेदन


कोल्हापूर, 8 ऑक्टोबर (हिं.स.)।

राज्यात गेल्या काही दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तरी या शेतकऱ्यांना त्वरित न्याय द्या. अशा मागणीचे निवेदन शिवसेना (ठाकरे गट)च्या वतीने तहसीलदार सुशीलकुमार बेल्हेकर यांच्यामार्फत शासनाला सादर केले.

अतिवृष्टीमुळे शेतजमिनी पाण्याखाली गेल्या, पिके नष्ट झाली, पशुधन व घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. तरीदेखील शासनाकडून अद्याप ठोस आणि परिणामकारक मदतीची घोषणा झालेली नाही.पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने तसेच शिवसेना नेते व आमदार सुनील प्रभु तसेंच संपर्कप्रमुख अरुणभाई दुधवडकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संजय चौगुले यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार सुशीलकुमार बेल्हेकर यांच्यामार्फत शासनाला निवेदन सादर केले.

निवेदनामध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या पिक नुकसानीसाठी शेतकऱ्यांना हेक्टरी रुपये ५० हजार इतकी थेट आर्थिक मदत त्वरित द्यावी. संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सर्व प्रकारच्या कर्जातून मुक्त करावे. पीक विम्याचे कठीण निकष शिथिल करून पंचनाम्याशिवाय विमा रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी. घरे व पशुधनाचे नुकसान झालेल्या नागरिकांना योग्य आणि पुरेसा मोबदला त्वरित द्यावा. या मागण्या करण्यात आल्या.

संजय चौगुले यांनी सांगितले की, शेतकरी हा राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. पण सततच्या नैसर्गिक आपत्ती, कर्जाचे ओझे आणि अपुऱ्या मदतीमुळे तो निराश झाला आहे. शासनाने तातडीने सरसकट कर्जमुक्ती आणि थेट आर्थिक मदतीचा निर्णय घ्यावा, हीच खरी शेतकऱ्यांप्रती न्यायाची दिशा ठरेल.

यावेळी उपजिल्हाप्रमुख साताप्पा भवान, तालुकाप्रमुख बाजीराव पाटील, महिला आघाडी उपजिल्हाप्रमुख सुवर्णाताई धनवडे, महिला आघाडी तालुकाप्रमुख उषाताई चौगुले, युवासेना उपजिल्हा अधिकारी सचिन पाटील, हातकणंगले शहरप्रमुख धोंडीराम कोरवी यांच्यासह शिवसैनिक, युवासैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar


 rajesh pande