नाशिक, 8 ऑक्टोबर, (हिं.स.)। संदीप विद्यापीठ, नाशिक येथे नासा (NASA) इंटरनॅशनल स्पेस अॅप्स चॅलेंज 2025ही जागतिक हॅकॅथाॅन स्पर्धा संपन्न झाली .
दरवर्षी ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जगभरात आयोजित केल्या जाणाऱ्या या स्पर्धेला यावर्षी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून 800 हून अधिक विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून, तसेच 700 हून अधिक विद्यार्थ्यांनी ऑनलाईन माध्यमातून सहभाग नोंदविला आहे.
संदीप विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ संदीप झा म्हणाले की ही स्पर्धा तरुण विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावरील अवकाश आणि पृथ्वी-संबंधित समस्यांवर सर्जनशील उपाय शोधण्यासाठी प्रोत्साहित करत असून अशा स्पर्धेने संशोधनास अमूल्य मदत होईल
या प्रसंगी मुख्य अतिथी म्हणून रविकुमार वर्मा, वरिष्ठ शास्त्रज्ञ, स्पेस अॅप्लिकेशन सेंटर,इस्रो (ISRO) आणि साकेत चतुर्वेदी, मुख्य कार्यकारी अधिकारी , हिंदुस्तान एरोनॉटिक्सलिमिटेड ,ओमप्रकाश कुलकर्णी, गोविंद झा, आणि अपूर्वा जाखडी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV