- भारताची प्रगत अभियांत्रिकी क्षमता तसेच जागतिक ऊर्जा उपायांमध्ये अग्रणी भूमिका
मुंबई, 8 ऑक्टोबर (हिं.स.)। अमेरिकेतील वीजनिर्मिती प्रकल्पासाठी गोदरेज एंटरप्रायझेस ग्रुपच्या प्रोसेस इक्विपमेंट व्यवसायाने सुमारे 450 मेट्रिक टन वजनाचे आतापर्यंतचे सर्वात वजनदार इकोलेअर सरफेस कंडेन्सर यशस्वीरित्या तयार करून वितरित केले आहे. नैसर्गिक वायूवर चालण्यासाठी हा प्रकल्प डिझाइन केला असून तो अंशतः हायड्रोजन-सक्षम म्हणून डिझाइन केलेला आहे. जो स्वच्छ ऊर्जा प्रणालींच्या संक्रमणास चालना तसेच समर्थन देतो.
गुजरातमधील दहेज येथील गोदरेजच्या ग्रीनको-प्रमाणित कारखान्यात हा कंडेन्सर तयार करत भारतीय उद्योगाने पुन्हा एकदा या प्रगत उपकरणांचे उत्पादन आणि थेट प्रकल्प स्थळी वितरण करण्यातील आपले कौशल्य सिद्ध केले आहे. कंपनीच्या 'मेक इन इंडिया फॉर द वर्ल्ड' व्हिजनला तसेच प्रगत अभियांत्रिकी आणि जागतिक दर्जाच्या उत्पादनाचे केंद्र म्हणून भारताच्या वाढत्या प्रतिष्ठेला हा टप्पा बळकटी देतो.
गोदरेज एंटरप्रायझेस ग्रुपच्या प्रोसेस इक्विपमेंट बिझनेसचे कार्यकारी उपाध्यक्ष आणि व्यवसाय प्रमुख हुसेन शरियार म्हणाले, आमचा हा सर्वात मोठा इकोलेअर सरफेस कंडेन्सर हा अभियांत्रिकी क्षेत्रातील महत्त्वाचा टप्पा नाही तर भारत जगासाठी काय साध्य करू शकतो याचे ते निदर्शक आहे. अत्याधुनिक उत्पादन, अद्ययावत इन-हाऊस डिझाइन तंत्रज्ञान आणि जागतिक दर्जाच्या लॉजिस्टिक क्षमतांसह, हा प्रकल्प जागतिक स्तरावर गुंतागुंतीचे स्वच्छ ऊर्जा उपाय अंमलात आणण्यासाठी गोदरेजची एंड-टू-एंड क्षमता दर्शवतो. आमच्या इकोलेअर तंत्रज्ञानाद्वारे, आम्ही जागतिक वीज निर्मिती प्रकल्पांमध्ये योगदान देतो आणि जबाबदारीने तसेच दीर्घकाळासाठी 'मेक इन इंडिया फॉर द वर्ल्ड' या आमच्या वचनबद्धतेची पुष्टी करतो.
गोदरेजने यापूर्वी जागतिक स्तरावरील ग्रीन हायड्रोजन, ब्लू हायड्रोजन आणि ब्लू अमोनिया प्रकल्पांमध्ये योगदान दिले आहे. सध्या जगभरातील भूऔष्णिक ऊर्जा आणि कार्बन कॅप्चर प्रकल्पांसाठीच्या ऑर्डर्सची अंमलबजावणी ते करत आहेत. यामुळे स्वच्छ ऊर्जा परिसंस्थेत त्यांचे स्थान अधिक मजबूत होते आहे. कंपनीने दहेज येथील उत्पादन केंद्रातील पायाभूत सुविधा वाढविण्यासाठी 200 कोटींची गुंतवणूक केली आहे, ज्यामुळे क्लिष्ट आणि मोठ्या प्रमाणातील प्रकल्पांची अंमलबजावणी अधिक कार्यक्षमतेने करणे शक्य झाले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतून येणाऱ्या जवळपास 70 टक्के महसूलासह, प्रगत अभियांत्रिकी उपायांसाठी एक विश्वासार्ह केंद्र म्हणून गोदरेज भारताचे स्थान अधिक भक्कम करते आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule