अमरावती : संत बाबा हरदासराम सेवामंडळ येथील प्रदर्शनीमध्ये भीषण आग
अमरावती, 8 ऑक्टोबर (हिं.स.)। दस्तुरनगर येथील संतबाबा हरदासराम सेवा मंडळ कार्यालयात सुरू असलेल्या कपड्याच्या प्रदर्शनीमध्ये सोमवारी (ता. सहा) रात्री ८ वाजताच्या सुमारास भीषण आग लागल्याने चांगलाच गोंधळ उडाला. यावेळी २०० ते ३०० महिला प्रदर्शनीमध्ये हो
अमरावती : संत बाबा हरदासराम सेवामंडळ येथील प्रदर्शनीमध्ये भीषण आग


अमरावती, 8 ऑक्टोबर (हिं.स.)। दस्तुरनगर येथील संतबाबा हरदासराम सेवा मंडळ कार्यालयात सुरू असलेल्या कपड्याच्या प्रदर्शनीमध्ये सोमवारी (ता. सहा) रात्री ८ वाजताच्या सुमारास भीषण आग लागल्याने चांगलाच गोंधळ उडाला. यावेळी २०० ते ३०० महिला प्रदर्शनीमध्ये होत्या, परंतु वेळीच अग्निशमन विभाग पोहचल्याने मोठी घटना टळली.

दस्तुरनगर परिसरात संतबाबा हरदासराम सेवा मंडळ आहे. खाली संतबाबा हरदाराम यांचे छोटे मंदिर आहे आणि वर हॉल आहे. या हॉलमध्ये संधी समाज बांधवाचे छेटे-मोठे कार्यक्रम होत असतात. दिवळीनिमीत्त सोमवारपासून समाजातील काही व्यापाऱ्यांनी दिवाळी प्रदर्शनी लावली होती. यामध्ये कपडे, ज्वेलरी, खाद्यपदार्थाचे स्टॉलसह अन्य ४० ते ४५ दुकाने थाटली होती आणि सोमवारी सकाळी प्रदर्शनीचे उ‌द्घाटन झाले होते. सायंकाळपासून परिसरातील महिलांची प्रदर्शनी पाहण्याकरिता मोठ्या प्रमाणात गर्दी होती. रात्री ८ वाजताच्या सुमारास प्रदर्शनीमध्ये महिला कपडे व ज्वेलरी पाहत असताना विद्युत मिटरमध्ये अचानक शॉट सर्कीट झाल्यामुळे आग लागली. काही वेळातच आग प्रदर्शनीमध्ये पोहचली. त्यामुळे महिला व दुकानदार घाबरले आणि सर्व हॉलमधून बाहेर निघण्याचा प्रयत्न करीत होते. त्यामुळे एकच गोंधळ उडाला आणि चेंगराचेंगरी झाली. स्थानिकांनी अग्निशन विभागाला माहिती दिली. माहिती मिळताच दोन बंब घटनास्थळी पोहचले. परंतु प्रदर्शनीमध्ये मोठ्या संख्याने महिला व पुरुष असल्याने त्यांनी रेस्क्यू पथकाला पाचारण करण्यात आले. तत्काळ रेस्क्यू पथकाने सर्व महिलांसह पुरुषांना बाहेर काढून आगिवर नियंत्रण मिळविले. त्यानंतर त्यांनी पाहणी केली असता ज्या हॉलमध्ये प्रदर्शनी होती. तेथील दुकानदारांन हॉलच्या खाली एकाच मिटरमधून अवैध विद्युत पुरवठा घेतल होता. त्यामुळे शॉट सर्कीट झाले आणि आग लागली. प्रशासनान या घटनेची गंभीर दखल घेऊन आयोजकांवर कायदेशीर कारवा करण्याची मागणी सर्व सामान्य नागरिक करीत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande