‘एआय’चा वापर करून उत्पन्न दीडपट करा : आ.डॉ.राहुल पाटील
परभणी, 8 ऑक्टोबर (हिं.स.)। ए आय या आधुनिक तंत्रज्ञानामुळे शेतीत उत्पन्न वाढत आहे, त्यामुळे आपल्या भागातील शेतकर्‍यांनी ए आय या तंत्रज्ञानाचा वापर करून आपले उत्पन्न दीडपट करावे, असे आवाहन आमदार डॉ. राहुल पाटील यांनी केले. तालुक्यातील
पिंगळी येथे घेतला शेतकरी मेळावा


परभणी, 8 ऑक्टोबर (हिं.स.)।

ए आय या आधुनिक तंत्रज्ञानामुळे शेतीत उत्पन्न वाढत आहे, त्यामुळे आपल्या भागातील शेतकर्‍यांनी ए आय या तंत्रज्ञानाचा वापर करून आपले उत्पन्न दीडपट करावे, असे आवाहन आमदार डॉ. राहुल पाटील यांनी केले.

तालुक्यातील पिंगळी बाजार येथील श्रीक्षेत्र गोकुळनाथ येथे पिंगळी विभागातील उस उत्पादक शेतकर्‍यांसाठी श्रीलक्ष्मी नृसिंह शुगर्सच्या वतीने परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. यावेळी आ.पाटील बोलत होते. या मेळाव्याला ज्येष्ठ संचालक न. ची. जाधव, जनरल मॅनेजर सुभाष सोलव, मुख्य शेती अधिकारी तुळशीराम अंभोरे, ऊस विकास अधिकारी समर्थ अवचार, ऊस पुरवठा अधिकारी नवनाथ कराळे यांच्यासह ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

पुढे बोलताना आमदार पाटील म्हणाले, सर्वच क्षेत्रात तंत्रज्ञान पुढे गेले आहे. शेती क्षेत्रात देखील विविध प्रकारचे तंत्रज्ञान आले आहे. यामुळे उत्पन्नात वाढ होत आहे. आपल्या भागातील शेतकर्‍यांनी एआय या तंत्रज्ञानाचा वापर करून आपले उत्पन्न दीडपट करावे, श्रीलक्ष्मी नृसिंह शुगर्सच्या माध्यमातून शेतकर्‍यांना लागेल ते तंत्रज्ञान आपण उपलब्ध करून देणार आहे. पिंगळी व परिसरात उसाचे उत्पादन वाढावे यासाठी शेतकर्‍यांनी उसाची लागवड करावी असे आवाहन आ.पाटील यांनी केले. परभणी जिल्ह्यात धवल क्रांती केली जाणार आहे त्यासाठीच मानवत येथे दूध संकलन केंद्र उभारण्यात आले आहे.याच बरोबर 25 हजार लिटरचे संकलन होत आहे. एक लाख लिटर दुधाचे संकलन करण्याचा प्रयत्न असून शेतकर्‍यांनी शेतीला जोड व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय करावा असे देखील आवाहन आमदार पाटील यांनी यावेळी केले. दुग्ध व्यवसाय करणार्‍या पशुपालकांना सवलतीच्या दरात गोठे देण्यात येणार आहेत.तसेच पुढील वर्षीपासून कारखान्याच्यावतीने उस उत्पादक शेतकर्‍यांना कर्ज, उस रोपे, रासायनीक खते देखील देण्यात येणार आहे, अशी माहीती आमदार पाटील यांनी दिली. या शेतकरी मेळाव्यात कारखान्याच्या वतीने मार्गदर्शन करण्यात आले. मोठ्या संख्येने उस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande