जळगाव-अहमदाबाद विमानसेवा पुन्हा सुरू, मुंबईकरता २६ ऑक्टोबरपासून दररोज
जळगाव, 8 ऑक्टोबर (हिं.स.) जळगाव विमानतळावरून ‘अलायन्स एअर’ कंपनीकडून सध्या आठवड्यातून चार दिवस सुरू असलेली जळगाव-मुंबई विमानसेवा २६ ऑक्टोबरपासून दररोज उपलब्ध होणार आहे. याबरोबरच दोन महिन्यांपासून बंद असलेली अहमदाबाद सेवाही पुन्हा सुरू झाली आहे. ‘उ
जळगाव-अहमदाबाद विमानसेवा पुन्हा सुरू, मुंबईकरता २६ ऑक्टोबरपासून दररोज


जळगाव, 8 ऑक्टोबर (हिं.स.) जळगाव विमानतळावरून ‘अलायन्स एअर’ कंपनीकडून सध्या आठवड्यातून चार दिवस सुरू असलेली जळगाव-मुंबई विमानसेवा २६ ऑक्टोबरपासून दररोज उपलब्ध होणार आहे. याबरोबरच दोन महिन्यांपासून बंद असलेली अहमदाबाद सेवाही पुन्हा सुरू झाली आहे. ‘उडान’ योजनेंतर्गत जळगाव विमानतळावरून गोवा, पुणे, हैदराबाद, मुंबई आणि अहमदाबाद या ठिकाणी विमानसेवा सुरू आहे. विमान रद्द होण्याच्या घटनांमुळे प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत होता. ‘अलायन्स एअर’च्या मुंबई आणि अहमदाबाद विमानफेऱ्या रद्द करण्याचे प्रमाण अधिक होते. दररोज सेवा सुरू झाल्याने केवळ दीड तासात मुंबई गाठता येणार आहे.अहमदाबाद येथे १२ जूनला ‘एअर इंडिया’ या विमानाचा अपघात झाला होता. त्यानंतर ‘अलायन्स एअर’ विमान कंपनीने त्यांच्या ताफ्यातील विमानांच्या देखभाल आणि दुरुस्तीची कामे हाती घेतली होती. त्यामुळे ही सेवा ऑगस्टपासून बंद होती. आता दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ही सेवा पुन्हा सुरू झाली असून, मंगळवार, गुरुवार, शुक्रवार आणि रविवार अशा आठवड्यातील चार दिवस ही सेवा उपलब्ध राहणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande