जळगाव, 8 ऑक्टोबर, (हिं.स.) यंदा १८ ते २१ ऑक्टोबरपर्यंत दिवाळी सण साजरा केला जाईल. दिवाळी सण साजरा करण्यासाठी अनेक जण कुटुंबासह गावी जातात. मात्र, यादरम्यान, रेल्वेचे आरक्षण फुल्ल असल्याने अनेकजण एस.टी. किंवा खासगी ट्रॅव्हल्सला पसंती देतात. मात्र ही संधी साधत खासगी ट्रॅव्हल्स मालकांनी तिकीट दरात भरमसाठ वाढ केली आहे.
सध्या पुणे, मुंबईहुन जळगाव प्रवासाचा तिकीटदर ५०० ते ९०० पर्यंत आहे. मात्र दिवाळीत आधीच हे तिकीट दर थेट २ हजार ते २ हजार ५०० रुपयांपर्यंत पोचले असेल. अर्थात, रेल्वेच्या थर्ड एसीपेक्षाही ट्रॅव्हल्सचे भाडे तीनपटने अधिक असून दिवाळीतील गर्दीमुळे खासगी बसचे चांगभले होत असून सामान्य प्रवाशांचे दिवाळे निघत आहे. एसटी महामंडळाकडून दिवाळीत होणारी १० टक्के हंगामी भाडेवाढ रद्द केली आपुणे, मुंबई, नागपूरसह सुरत या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात जळगाव जिल्ह्यातील नागरिकांचा रहिवास आहे. सण आणि उत्सवांच्या या काळात या भागातील नोकरदार हे गावाकडे येत असतात. या काळात रेल्वे आरक्षण फुल असल्याने एस. टी. ज किंवा खासगी ट्रॅव्हल्सला पसंती देतात. मात्र ही संधी साधत जळगावात ट्रॅव्हल्स मालकांकडून मनमानी पद्धतीने भाडे आकारणी करून प्रवाशांची लूट केली जाते. पुणे-जळगाव परतीच्या मार्गावरील तिकीट १४ तारखेपासून वाढण्यास सुरुवात होत आहे. यानंतर दर वाढल्याने प्रवाशांच्या खिशाला कात्री लागणार आहे.
सध्या पुण्यासाठी ७०० ते ९०० रुपये भाडे आकारले जात आहे. मात्र १६ ऑक्टोबर रोजी पुणे ते जळगाव प्रवासासाठी २००० ते २५०० रुपयापर्यंतचे भाडे आकारले जाते. मुंबई-जळगावसाठी सध्या ६०० ते ८०० रुपये तिकीट दर आहे. हे दर १६ ऑक्टोबर रोजी २००० ते १५०० पर्यंत असेल तर नागपूर-जळगावसाठी सध्या ६५० ते ८५० रुपये आहे. मात्र १६ ऑक्टोबर रोजी १५०० ते २००० रुपयापर्यंतचे भाडे आकारले जाते. सध्या सुरत- जळगाव साठी ५०० ते ७०० रुपयांपर्यंत भाडे आकारले जात आहे. मात्र १६ रोजी परतीसाठी १५०० ते २००० रुपये आकारले जाते लक्झरीपाठोपाठ विमान तिकीट दरात वाढ करण्यात आली आहे. दिवाळीच्या पूर्वसंध्येपासून (दि.१६) पुणे, मुंबई मार्गावरील विमान तिकीट १० हजार ते १३ हजार रुपयांवर गेले आहे. जळगावहून मुंबईचे नियमित तिकीट २०२५ रुपये आहे. ते १६ तारखेला दोन्हीकडील विमान तिकीट १०,४०० रुपयांवर आहे. तर १८ तारखेला ६५६० रुपये आहे. २० तारखेनंतर ते नियमित २०२५ रुपये दाखवत आहे. जळगाव-पुणे मार्गावरील नियमित विमान तिकिटाचे दर १७०० ते २००० रुपयांच्या घरात आहे. पुणे-जळगाव परतीच्या मार्गावरील तिकीट १४ तारखेपासून वाढण्यास सुरुवात होत आहे. १६ तारखेला ४ हजाराच्या पुढे, १७ ला सर्वाधिक १३२००, १८ दोन हजाराने कमी होऊन ११२०० रुपये तर १९ तारखेला ४४०० रुपये आहे व त्यानंतर दर पूर्वपदावर आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर