छ. संभाजीनगर - मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाकडे मदतीचा ओघ
छत्रपती संभाजीनगर, 8 ऑक्टोबर (हिं.स.)। शेतकऱ्यांसाठी सामाजिक संस्थांचा मदतीचा हात मिळत असून मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाकडे मदतीचा ओघ वाढला आहे. अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांना विविध सामाजिक संस्थांनी मदतीचा हात देऊ केला आहे. जिल्ह
अ


छत्रपती संभाजीनगर, 8 ऑक्टोबर (हिं.स.)। शेतकऱ्यांसाठी सामाजिक संस्थांचा मदतीचा हात मिळत असून मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाकडे मदतीचा ओघ वाढला आहे. अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांना विविध सामाजिक संस्थांनी मदतीचा हात देऊ केला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात असलेल्या मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाकडे मदतीचा ओघ सुरु झाला असून धनादेश प्राप्त होत आहेत.

प्रोफेशनल साऊंड ॲंण्ड लाइट असोसिएशन यांच्या वतीने एक लाख एकशे अकरा रुपये, समर्थनगर महिला मंडळ यांच्यावतीने ११ हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला. तसेच भगवान बलराम नगरी सहकारी पतसंस्था यांच्या वतीने ७ हजार रुपये, गीताई सेवाभावी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने २१ हजार रुपये तर संस्थान एकनाथ मंदिर, संभाजी पेठ यांच्या वतीने ५१ हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला. आतापर्यंत एकूण चार लाख तीस हजार एकशे अकरा) रुपयांची मदत जमा करण्यात आली आहे,असे मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे जिल्हा समन्वयक डॉ. बालाजी गोरे यांनी सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande