गडचिरोली येथील महिंद्रा ट्रॅक्टर कौशल्य विकास केंद्राचे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन
मुंबई, 8 ऑक्टोबर, (हिं.स.)। महाराष्ट्रातील गडचिरोली येथील महिंद्रा ट्रॅक्टरच्या कौशल्य विकास केंद्राचे आज उद्घाटन झाले. भारताचे माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी आज मुंबईतून ऑनलाइन पद्धतीने हे उद्घाटन केले. ग्रामीण तरुणांना उद्योगाशी संबंधि
गडचिरोली येथील महिंद्रा ट्रॅक्टर कौशल्य विकास केंद्राचे  माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन


मुंबई, 8 ऑक्टोबर, (हिं.स.)। महाराष्ट्रातील गडचिरोली येथील महिंद्रा ट्रॅक्टरच्या कौशल्य विकास केंद्राचे आज उद्घाटन झाले. भारताचे माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी आज मुंबईतून ऑनलाइन पद्धतीने हे उद्घाटन केले. ग्रामीण तरुणांना उद्योगाशी संबंधित कौशल्यांनी सुसज्ज करून सक्षम करणे हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे. ज्यामुळे या भागात रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील.

भारतातील नंबर1 ट्रॅक्टर ब्रँड असलेल्या महिंद्रा ट्रॅक्टरने भारताच्या ग्रामीण भागातील कौशल्य आणि आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण विभाग (DVET) आणि महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीने (MSSDS) भागीदारी करत गडचिरोली येथील सरकारी आयटीआय कॉलेजमध्ये हे कौशल्य विकास केंद्र स्थापन केले.

भारताची सर्वात मोठी शक्ती असलेल्या लोकसंख्येचा उपयोग करून घेण्यासाठी कौशल्य विकासावर भर देण्याचे सध्या देशाच्या नेतृत्वाचे धोरण आहे. त्याच अनुषंगाने हा उपक्रम राबवला जात आहे. गडचिरोलीतील तरुणांना उद्योगासाठी आवश्यक कौशल्ये शिकवण्यासोबतच स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध करून देण्यावरही लक्ष केंद्रित करते.

गडचिरोलीतील ट्रॅक्टर कौशल्य विकास केंद्राच्या माध्यमातून ट्रॅक्टर आणि शेतीसाठी आवश्यक यंत्रसामग्रीमधील उद्योग कौशल्य आणि उत्कृष्टता महिंद्रा येथील विद्यार्थ्यांपर्यं पोहोचवेल. ग्रामीण युवकांना अत्याधुनिक तांत्रिक उपकरणे तसेच ट्रॅक्टरशी संबंधित कौशल्याचे विविध पैलू समजावून सांगण्यासोबतच त्याचा प्रत्यक्ष अनुभव देणाऱ्या सर्वोत्तम प्रशिक्षकांनी तयार केलेल्या नियोजनबद्ध अभ्यासक्रमामुळे हे शक्य झाले आहे. या केंद्रामुळे विविध करिअर संधींचा मार्ग मोकळा होणार आहे. ज्यामध्ये उत्पादन संयंत्रांमधील भूमिका आणि डीलरशिपच्या ठिकाणांवरील विक्री तसेच सेवा यांचा समावेश आहे.

या प्रसंगी महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडच्या शेती उपकरण व्यवसायाचे अध्यक्ष श्री. विजय नाक्रा म्हणाले, माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी गडचिरोली येथील महिंद्रा ट्रॅक्टर कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन केल्याचा आम्हाला खूप अभिमान आहे. महाराष्ट्र हे केवळ एक आघाडीचे औद्योगिक केंद्र नाही तर कृषी क्षेत्राच्या विकासाशी, त्याच्या प्रवासाशी खोलवर जोडलेले राज्य आहे. महाराष्ट्र सरकारसोबत भागीदारी करणे, कौशल्य जोपासण्यासोबतच त्याला योग्य संधी देणे आणि आशेला खतपाणी घालून ग्रामीण समुदायाला उन्नत करणारे भविष्य निर्माण करणे ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande