लातूर, 8 ऑक्टोबर (हिं.स.)।
भाजयुमो जिल्हाध्यक्ष ऋषिकेश कराड यांच्या नियुक्तीचे अनेकांकडून अभिनंदन
भाजयुमोचे प्रदेश सचिव तथा युवा नेते ऋषिकेशदादा रमेशआप्पा कराड यांची लातूर जिल्हा ग्रामीण भारतीय जनता युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी नुकतीच नियुक्ती जाहीर करण्यात आली असून नियुक्ती जाहीर होताच अनेकांनी फटाके फोडून, सत्कार करून ऋषिकेशदादा यांचे अभिनंदन केले.
गेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघात अत्यंत प्रभावी प्रचार यंत्रणा राबवून आपल्या खास वक्तृत्व शैलीत प्रभाव टाकणारे युवा नेते भाजयुमोचे प्रदेश सचिव ऋषिकेशदादा रमेशआप्पा कराड यांची लातूर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी नुकतीच निवड जाहीर झाल्याचे समजताच भाजपा संवाद कार्यासमोर फटाके फोडून आनंद व्यक्त केला तर अनेकांनी पुष्पहार घालून पेढे भरून अभिनंदन केले.
लातूर ग्रामीणचे आमदार श्री. रमेशआप्पा कराड यांची भाजपाच्या संवाद कार्यालयात भेट घेऊन ऋषिकेश दादा कराड यांनी आशीर्वाद घेतले. यावेळी भारतीय जनता पार्टीचे भागवत सोट, सतीश आंबेकर, अनिल भिसे, प्रताप पाटील, सुरज शिंदे, दशरथ सरवदे, पांडुरंग बालवाड, अमर चव्हाण, श्याम वाघमारे, चंद्रकांत कातळे, महादेव साळुंके, रवींद्र नागरगोजे, बाबासाहेब भिसे, संपत कराड, लक्ष्मण यादव,भाऊसाहेब गुळबिले, राज जाधव, नरसिंग येलगटे, चंद्रकांत माने, ओम चपटे, अनिकेत गुड्डे, लक्ष्मण खलंग्रे, विजय चिते, मोहम्मद खान, अभिमान वायबसे, सचिन जाधव, शिवम मिटकरी यांच्यासह भाजपाचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis