लातूर, 8 ऑक्टोबर, (हिं.स.)। पिक कर्जाची नियमित परतफेड करणा-या शेतकऱ्यांकडून व्याज वसुली करू नका असे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचे निर्देश दिले आहेत.
महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकरी चिंतेत असून, राज्यातील सर्वच बँकेने पीक कर्ज जे शेतकरी नियमित भरतात अशा शेतकऱ्यांसाठी व्याज आकारणी करू नये अश्या स्पष्ट सूचना व निर्देश राज्याचे सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांनी मुंबई मंत्रालयात आयोजित महत्वपूर्ण बैठकीत दिले आहेत. शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकार कटिबद्ध असून त्यांच्या अडचणींवर ठोस उपाययोजना करण्यास प्रशासन व सहकार विभाग तत्पर असल्याचे सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांनी सांगितले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis