ग्रामविकास खात्यांतर्गत कामांसाठी मंत्री गोरे सकारात्मक - आमदार चिखलीकर
नांदेड, 8 ऑक्टोबर (हिं.स.) महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांची लोहा कंधार विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी भेट घेतली. नांदेड जिल्ह्यातील जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या संद
अ


नांदेड, 8 ऑक्टोबर (हिं.स.)

महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांची लोहा कंधार विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी भेट घेतली. नांदेड जिल्ह्यातील जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या संदर्भातील अडी अडचणी सोडवण्याच्या संदर्भात मंत्री गोरे यांच्याशी त्यांनी चर्चा केली.

लोहा कंधार विधानसभा मतदारसंघातील ग्रामविकास अंतर्गत येणाऱ्या कामाच्या संदर्भात मंत्री गोरे यांच्याकडे आग्रही मागणी केली यावर सकारात्मक चर्चा केली. असे आमदार चिखलीकर यांनी सांगितले. यावेळी समवेत संघटनेचे कार्याध्यक्ष श्री बाबुराव पुजरवाड उपस्थित होते.

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande