छत्रपती संभाजीनगर, 8 ऑक्टोबर (हिं.स.)।
छत्रपती संभाजी नगर शहरातील चिकलठाणा परिसरात पोलिस आणि गोरक्षकावर हल्ला चढविल्या प्रकरणी पोलिसांनी गंभीर दखल घेत तीन गुन्हे दाखल केले आहेत ग जमावावर हत्येचा प्रयत्न, मारहाण, दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला. आज बुधवारी गोरक्षक गणेश शेळके यांच्यावर धर्मांधांनी केलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ हिंदू समाज आणि गोरक्षक दलाच्यावतीने जोरदार निषेध आंदोलन करण्यात आले क्रांती चौकात हे आंदोलन करण्यात आले आहे.
प्रतिबंधित जनावरांच्या मांसाची तस्करी होत असल्याच्या माहितीवरून धाव घेतलेल्या गोरक्षक व पोलिसावर महिला, तरुण व अल्पवयीन मुलांच्या २० ते २५ जणांच्या जमावाने शस्त्र, लाठ्या काठ्याने हल्ला चढवला. यात गणेश आप्पासाहेब शेळके (२४, रा. पळशी) हा गंभीर जखमी झाला.
केंब्रिज चौकात प्रतिबंधित मांसाची तस्करी होणार असल्याची माहिती गोरक्षकांना मिळाली होती. एमआयडीसी सिडको पोलिसांनी त्यावरून केंब्रिज चौकात मांस वाहून नेणारी रिक्षा पकडली. त्याच दरम्यान दुसरी रिक्षा सुमारास चिकलठाण्यातील पुष्पक गार्डन परिसरात गेल्याचे त्यांना कळले. पोलिस अंमलदार अंकुश ढगे, गणेश शेळके यांनी त्या दिशेने धाव घेतली. गाेरक्षक व पोलिस आल्याचे कळताच मांस तस्कर संतप्त झाले व त्यांनी जमाव जमवून दोघांवर हल्ला चढवला. चाकू, लोखंडी रॉड, लाठ्या काठ्याने वार करत गणेशला ठार मारण्याचा प्रयत्न केला. ढगे यांना धक्काबुक्की केली. ढगे यांनी त्याही परिस्थितीत गणेशला जमावाच्या तावडीतून सोडवत दुचाकीवरून रुग्णालयात भरती केले. त्याच्या पाठ, डोक्यावर खोलवर जखमा झाल्या.
पोलिस उपायुक्त प्रशांत स्वामी, पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर, अशोक भंडारे, सचिन इंगोले यांनी घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत हल्लेखोर पसार झाले. चिकलठाण्यात बंदोबस्त ठेवण्यात आला.
दरम्यान चिकलठाणा येथे गोरक्षक गणेश शेळके यांच्यावर धर्मांधांनी केलेल्या भ्याड हल्ल्याच्या पोलिस प्रशासनाकडून धर्मांधांवर कोणतीही कारवाई होत नसल्याच्या निषेधार्थ क्रांती चौकात समस्त हिंदू समाज आणि गोरक्षक दल यांच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले.
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis