नांदेड, 8 ऑक्टोबर (हिं.स.)।
मुदखेड (ता. नांदेड) येथील महादेव गल्लीतील महादेव मंदिरामध्ये अज्ञात चोरट्याने मंदिरातील दानपेटी व इतर वस्तू लंपास केल्याची धक्कादायक घटना घडली.
या घटनेचा संपूर्ण प्रकार मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, चोरटा तोंडाला दस्ती बांधलेला व पायात स्पोर्ट शूज घातलेला असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
चोरट्याने मंदिरातील दानपेटी बाहेर नेऊन लंपास केली. या घटनेचा व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. देवस्थानातील गल्ला चोरी झाल्यामुळे परिसरात संतापाचे वातावरण असून, पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis