गतिमंद मुलांच्या संगोपनासाठी मदतीची गरज : शकुंतला वाघ
नाशिक, 8 ऑक्टोबर (हिं.स.)। नाशिक जीवन गतिमान आहे. पण जन्मताच ज्याची बुद्धी मंद आहे त्यांच्या बुद्धीला गती देणं अवघड आणि जिकीरीचे काम आहे. ते काम रजनीताई लिमये मयांनी केले आहे. या मुलांच्या संगोपनासाठी विविध गोष्टींची गरज असते. त्याची दखल नाशिककरां
गतिमंद मुलांच्या संगोपनासाठी मदतीची गरज : शकुंतला वाघ


नाशिक, 8 ऑक्टोबर (हिं.स.)। नाशिक जीवन गतिमान आहे. पण जन्मताच ज्याची बुद्धी मंद आहे त्यांच्या बुद्धीला गती देणं अवघड आणि जिकीरीचे काम आहे. ते काम रजनीताई लिमये मयांनी केले आहे. या मुलांच्या संगोपनासाठी विविध गोष्टींची गरज असते. त्याची दखल नाशिककरांनी घ्यावी, असे प्रतिपादन शकुंतला वाघ यांनी केले.

येथील निलवसंत फाउंडेशनच्या वतीने दिला जाणारा स्व. आ. डॉ. वसंतराव पवार स्मृती पुरस्कार वितरण समारंभप्रसंगी अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर नीलिमा पवार, आ. बिपिन कोल्हे, सुरेश बाबा पाटील, प्रबोधिनी संस्थेचे अध्यक्ष रोहिणी ढवळे, व्ही. बी. गायकवाड, रवींद्र मणियार, शशी जाधव, महंत गट्टे महाराज आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, समाजात लोकसंख्येच्या एक टक्का जरी आपण दिव्यांग धरले तरी एक दोन हजार वस्तीगृहांनी त्यांची समस्या पूर्ण होत नसते. यासाठी आपण प्रबोधिनिच्या मागे उभे राहिले पाहिजे. मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या रावसाहेब थोरात सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाची सुरुवात प्रांजल शेवाळे यांनी गायलेल्या स्वागत गीताने झाली. यावेळी विविध मान्यवरांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. नीलिमा पवार यांच्या हस्ते प्रबोधिनी ट्रस्टला पुरस्कार प्रदान करण्यात आला. एक लाख रुपयांचा धनादेश, मानपत्र व पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप होते. संस्थेचे अध्यक्ष रोहिणी ढवळे यांनी पुरस्कार स्वीकारला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. अविनाश आंधळे यांनी केले. वसंतराव खैरनार यांनी प्रबोधिनीचा परिचय करून दिला. रंजना पाटील यांनी मानपत्राच वाचन केले. डॉ. प्राची पवार यांनी आभार मानले. कार्यक्रमास परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande