छ. संभाजीनगर - पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्यात ८७ उमेदवारांची निवड
छत्रपती संभाजीनगर, 8 ऑक्टोबर, (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगर जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता कार्यालय व देवगिरी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आज आयोजीत पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्यात ८७ उमेदवारांची निवड झ
Q


छत्रपती संभाजीनगर, 8 ऑक्टोबर, (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगर जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता कार्यालय व देवगिरी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आज आयोजीत पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्यात ८७ उमेदवारांची निवड झाली, अशी महिती कौशल्य विकास व रोजगार अधिकारी सुरेश बहुरे यांनी दिली आहे.

उद्घाटन सोहळ्यास देवगिरी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे उपसंचालक प्रदिप दुर्गे हे अध्यक्षस्थानी उपस्थित हेाते. उपआयुक्त श्रीमती. विद्या शितोळे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.

या रोजगार मेळाव्यासाठी आण्णासाहेब पाटील मागास आर्थिक विकास महामंडळ, एम.आय.डी.सी स्कील डेव्हलपमेंट सेंटर, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, आण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, महात्मा फुले विकास महामंडळ, दिव्यांग विकास महामंडळ, संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ, मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ, वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ इ. नी आपल्या महामंडळाच्या योजनांची माहिती उमेदवारांना दिली.

मेळाव्यात बीजी-ली-ईन इलेक्ट्रिकल्स लि., सुदर्शन सौर शक्ती प्रा.लि., पगारीया ऑटो प्रा.लि., साई सु्प्रिम इक्युपमेंट, एलीगंट कोटिंग प्रा.ली., अलंकार इंजिनीअरींग ईक्युपमेंट प्रा.लि., एक्सल प्लेसमेंट., शिवशक्ती अग्रोटेक लि., मायलन लॅबोरेटरिझ लि., स्वंतत्र माक्रोफिन लि., निपुन स्किल्स लि., इत्यादी. नामांकीत कंपन्यांनी सहभागी होऊन उपस्थित उमेदवारांच्या मुलाखती घेऊन ८७ उमेदवारांची निवड केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande