पाथरीत न्यायालय मंजूर, वकील संघाकडून सईद खान यांचा सत्कार
परभणी, 8 ऑक्टोबर (हिं.स.)। पाथरी येथे न्यायालयीन कामकाजासाठी अतिरिक्त सत्र न्यायालय राज्य शासनाकडे मंजूर करण्यासाठी शिवसेना अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेशाध्यक्ष सईद खान यांनी पाठपुरावा केला होता त्याबद्दल वकील संघाने खान यांचा शिवसेना मध्यवर्ती का
पाथरीत  न्यायालय मंजूर, वकील संघाने केला सईद खान यांचा सत्कार


परभणी, 8 ऑक्टोबर (हिं.स.)।

पाथरी येथे न्यायालयीन कामकाजासाठी अतिरिक्त सत्र न्यायालय राज्य शासनाकडे मंजूर करण्यासाठी शिवसेना अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेशाध्यक्ष सईद खान यांनी पाठपुरावा केला होता त्याबद्दल वकील संघाने खान यांचा शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात सत्कार केला.

पाथरी हा परभणी जिल्ह्यातील एक महत्वचा तालुका आहे. यामध्ये जवळपास अनेक गावांचा समावेश आहे. अशा वेळी तालुक्यातील नागरिकांना तालुक्यातच न्यायालयीन कामाकाजासाठी सत्र न्यायालय असावे अशी आशा पाथरी वकील संघाने केली होती. त्यांच्या या मागणीचा गांभीर्याने विचार करून 27 मार्च 2023 रोजी, पाथरी शहरातील जिल्हा व सत्र न्यायालय तसेच वरिष्ठ न्यायालय स्थापन करण्यासाठी पाथरीतील वकील संघासोबत त्या वेळचे मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदन दिले होते.

मंत्री महोदयांनी या महत्वपूर्ण मागणीची गांभीर्याने दखल घेत शासनाने तात्काळ पाथरी शहरात जिल्हा व सत्र न्यायालय स्थापन करण्याचा निर्णय घेतला. हे महत्वपूर्ण काम पूर्णत्वाकडे नेण्यासाठी वेळोवेळी शासन दरबारी पाठपुरावा करत होतो. त्याचच हे यश आहे. असे खान यांनी सांगितले.

या निर्णयाच्या यशाबद्दल आज पाथरी वकील सघांनी शिवसेना भवन पाथरी येथे भेट घेऊन आभार मानले व सत्कार केला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande