पुणे, 8 ऑक्टोबर (हिं.स.)।महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी, तसेच शिक्षण मंडळाकडील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्यांना यंदाच्या दिवाळीनिमित्त ८.३३ टक्के बोनस जाहीर करण्यात आला आहे. सप्टेंबर महिन्याच्या वेतनासोबतच बोनस वितरित होणार असून, त्यामुळे कर्मचार्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
दिवाळीला अवघे दोन आठवडे शिल्लक असताना महापालिकेकडून बोनसची घोषणा करण्यात आली. रोजंदारीवर काम करणाऱ्या सेवकांनाही याचा लाभ मिळणार आहे. सप्टेंबरच्या वेतनासह बोनस जाहीर झाल्याने खरेदीसाठी पुरेसा वेळ मिळणार असल्याची भावना कर्मचार्यांकडून व्यक्त होत आहे.
विशेष म्हणजे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी महापालिकेच्या विविध विभागांत कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या चतुर्थ श्रेणीतील कर्मचार्यांनाही प्रथमच दिवाळीनिमित्त पाच हजार रुपयांचा बोनस जाहीर केला आहे. या निर्णयामुळे सर्व स्तरांवरील कर्मचार्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु