पुणे, 8 ऑक्टोबर (हिं.स.)।दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शहरातील फटाके विक्री स्टाॅल आणि फटाके वाजविण्याबाबत पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी नियमावली जाहीर केली अहे. त्यानुसार रात्री दहा ते सकाळी सहा या वेळेत फटाके वाजविण्यास बंदी घालण्यात आली आहे. पोलिसांचे आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
फटाके वाजविण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने नियमावली आखून दिली आहे. ध्वनी आणि वायू प्रदुषण टाळण्यासाटी नियमांचे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार रात्री दहा ते सकाळी सहा या वेळेत फटाके वाजविण्यास बंदी घालण्यात आली आहे. पोलिसांच्या नियमांनुसार मोठा आवाज करणारे ‘ॲटमबाॅम्ब’ वाजविणे, बाळगणे, तसेच विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. शहरातील रुग्णालये, तसेच शैक्षणिक संस्था, न्यायालयाच्या १०० मीटर परिसरात शांतता क्षेत्र आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु