कोल्हापूर, 8 ऑक्टोबर (हिं.स.)।
कोल्हापूर जिल्ह्यात प्रतिबंधित गुटखा, तंबाखूजन्य पदार्थांची निर्मिती, साठवणुक, वितरण, वाहतूक किंवा विक्रीबद्दल कोणतीही माहिती असल्यास किंवा मिळाल्यास याबाबत तक्रार नोंदविण्यासाठी पोलीस हेल्पलाईनला कळवावे असे आवाहन पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी केले आहे.
राज्य शासनाने प्रतिबंधीत अन्नपदार्थ (गुटखा, पानमसाला, सुगंधीत सुपारी, सुगंधीत तंबाखु व तत्सम पदार्थ) यांची निर्मिसती, साठवणुक, वितरण, वाहतुक किंवा विक्री यावर कायद्याने बंदी घातली आहे. या प्रतिबंधित पदार्थांचा वापर हा जनतेच्या आरोग्यास अपायकारक असुन सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक आहे. त्यामुळे नागरिकांना आपल्या आजुबाजुस अशा प्रतिबंधित अन्नपदार्थांची निर्मिती, साठवणुक, वितरण, वाहतूक किंवा विक्रीबद्दल कोणतीही माहिती असल्यास किंवा मिळाल्यास याबाबत तक्रार नोंदविण्यासाठी पोलीस हेल्पलाईन क्रमांक १०० व डायल ११२ उपलब्ध करुन देण्यात आला आहे. याबाबत कोणतीही माहिती अथवा तक्रार देण्यासाठी पोलीस हेल्पलाईन क्रमांक १०० व ११२ चा वापर करावा, असे आवाहन पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar