सरस्वती भुवन महाविद्यालयात क्रीडा महोत्सव सुरू
छत्रपती संभाजीनगर, 8 ऑक्टोबर (हिं.स.)। छत्रपती संभाजी नगर येथील सरस्वती भवन महाविद्यालयात आज क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या क्रीडा महोत्सवात महाविद्यालयाचे विद्यार्थी सहभागी झाले. क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन अत्यंत थाटामाटात संपन्न झाले. आक
अ


छत्रपती संभाजीनगर, 8 ऑक्टोबर (हिं.स.)।

छत्रपती संभाजी नगर येथील सरस्वती भवन महाविद्यालयात आज क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या क्रीडा महोत्सवात महाविद्यालयाचे विद्यार्थी सहभागी झाले. क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन अत्यंत थाटामाटात संपन्न झाले. आकाशात फुगे सोडून उद्घाटन करण्यात आले

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक, विभागीय केंद्र छत्रपती संभाजीनगर आणि सरस्वती भुवन महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले

.

उद्घाटनाला प्रमुख पाहुणे म्हणून देवगिरी बँक अध्यक्ष, तथा सिनेट सदस्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ श्री.किशोर शितोळे, प्राचार्य श्री.मकरंद जोशी मराठवाडा सांस्कृतिक मंडळाचे शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालय, तसेच शिवछत्रपती पुरस्कार विजेते, प्राचार्य डॉ.श्री.विवेक मिरगणे सरस्वती भुवन कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वरिष्ठ शैक्षणिक सल्लागार विभागीय केंद्र छत्रपती संभाजीनगर, डॉ.श्री.नंदकुमार सत्यनारायण राठी, विभागीय क्रीडा आयोजक म्हणून श्री.दयानंद कांबळे क्रीडा संचालक सरस्वती भुवन महाविद्यालय आणि डॉ.तृप्ती रोंघे, यांची उपस्थिती होती.

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande