अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना न्यायासाठी तिवसामध्ये शिवसेना (उबाठा) आणि शेतकऱ्यांचे निवेदन आंदोलन
अमरावती, 8 ऑक्टोबर (हिं.स.) तिवसा तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत मिळावी, शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे व विमा रक्कम तत्काळ खात्यात जमा करावी या मागण्यांसाठी आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) आणि स्थानिक शेतकऱ्यांच्या व
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना न्यायासाठी तिवसामध्ये शिवसेना (ऊबाठा) आणि शेतकऱ्यांचे निवेदन आंदोलन


अमरावती, 8 ऑक्टोबर (हिं.स.) तिवसा तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत मिळावी, शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे व विमा रक्कम तत्काळ खात्यात जमा करावी या मागण्यांसाठी आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) आणि स्थानिक शेतकऱ्यांच्या वतीने तिवसा तहसीलदार मयूर कळसे यांना निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनात प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे मांडण्यात आल्या: अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानीसाठी शेतकऱ्यांना प्रती हेक्टर ₹५०,००० थेट आर्थिक मदत जाहीर करावी.महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देण्यात यावी. पीक विमा मिळवण्यासाठीचे निकष शिथिल करून पंचनाम्याशिवाय विमा रक्कम त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी.अतिवृष्टीमुळे झालेल्या घरे व पशुधन नुकसानीसाठी जुने निकष न लावता त्वरित मोबदला द्यावा. शिवसेना (ऊबाठा) तालुका प्रमुख विलास माहुरे यांनी सरकारवर टीका करताना सांगितले की, विधानसभा निवडणुकीदरम्यान दिलेली सरसकट कर्जमाफीची आश्वासने अद्याप पूर्ण झालेली नाहीत, त्यामुळे शेतकरी अजूनही संकटात आहेत. शेतकऱ्यांवर आज नैसर्गिक आपत्ती, उत्पादन खर्चातील वाढ, खते-औषधांची महागाई, हमीभावाच्या अभावामुळे आर्थिक संकट ओढावले आहे. अनेक शेतकरी बँक व सावकारांच्या कर्जामुळे त्रस्त असून थकबाकी वसुली, नोटीसा, जप्ती कारवाई यामुळे आत्महत्या करण्यासही भाग पडत आहे. या पार्श्वभूमीवर सरसकट कर्जमाफी हीच एकमेव प्रभावी उपाय योजना असल्याचे निवेदनात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. यामध्ये सर्व प्रकारचे - थकबाकीदार, चालू, अल्प-मुदतीचे, सिंचन, शेडनेट, दुग्ध व्यवसायाशी संबंधित, तसेच सावकारी कर्जाचाही समावेश करावा, अशी ठाम मागणी करण्यात आली.या आंदोलनात शिवसेनेचे पदाधिकारी देविदास निकाळजे, अनिल कायंदे, सुभाष केवतकर, सागर रावणकर, किसन इंगोले, राहुल केणेकर, राजू सुलतान आणि तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande