परभणी, 8 ऑक्टोबर (हिं.स.)। जिंतूर तालुक्यात खरिप पिकांचे अतिवृष्टीने अतोनात असे नुकसान झाले असून त्यामुळे या आपदग्रस्त शेतकर्यांना आर्थिक मदतीसह त्या शेतकर्यांचा सातबारा कोरा करणे म्हणजे संपूर्ण कर्जमाफी करणे गरजेचे आहे, असे मत शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाने व्यक्त करीत येथील तहसील कार्यालयात जोरदार धरणे आंदोलन केले.
शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बंडू लांडगे, तालुकाप्रमुख रामजी शर्मा, संपर्कप्रमुख गंगाप्रसाद घुगे, महिला आघाडीच्या जिल्हा संघटक सूरेखा शेवाळे, अरविंद कटारे, अरुण चौधरी यांच्यासह अन्य नेतेमंडळींनी नायब तहसीलदार प्रशांत राके यांना एक निवेदन सादर केले व सवार्थाने संकटात सापडलेल्या शेतकर्यांना सर्वतोपरि मदत द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. आंदोलनकर्त्यांनी प्रशासनास आपल्या मागण्यांचे निवेदनही सादर केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis