शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी अंबादास दानवेंच्या नेतृत्वात तीव्र निदर्शने
छत्रपती संभाजीनगर, 8 ऑक्टोबर (हिं.स.)। शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने नेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करत जिल्हाधिकारी यांना शेतकऱ्यांच्या मागण्यांचे निवेदन देण्
अ


छत्रपती संभाजीनगर, 8 ऑक्टोबर (हिं.स.)।

शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने नेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करत जिल्हाधिकारी यांना शेतकऱ्यांच्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

३१ हजार ५०० कोटीच्या पॅकेजमधून शेतकऱ्यांमध्ये खोटा नरेटीव्ह पसरण्याचे काम राज्य सरकारने केले आहे. शेतकऱ्यांची मूळ मागणी हेक्टरी सरसकट ५० हजार रुपये नुकसान भरपाई, सरसकट संपूर्ण कर्जमुक्ती, पिक विम्याचे निकष पूर्ववत करावे. पुरात वाहून गेलेल्या घरांची, जनावरांची व दुकानांची आर्थिक भरपाई मुबलक प्रमाणात मिळावी ही असल्याने आज या मागण्या मान्य केल्या तरच शेतकऱ्यांना न्याय मिळेल यासाठी शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालय समोर तीव्र निदर्शने करत जिल्हाधिकारी यांना या मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

याप्रसंगी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, सहसंपर्कप्रमुख विजयराव साळवे, अनिल चोरडिया,जिल्हाप्रमुख राजेंद्र राठोड, महानगरप्रमुख राजू वैद्य, शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, तालुकाप्रमुख शंकर ठोंबरे आदी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande