सोलापूर, 8 ऑक्टोबर (हिं.स.)। दक्षिण सोलापूर तालुक्यात सीना नदीच्या पुरानंतर आणि अतिवृष्टीच्या तडाख्यानंतर गावे पुन्हा पूर्व पदावर येत आहेत. या कामी प्रशासनही जोमाने कामाला लागल्याचेे दिसून येत आहे.
दक्षिण सोलापूर तहसील कार्यालयाकडून 329 लाभार्थ्यांना दहा हजार रुपयांचा लाभ देण्यात आला असल्याचे तहसीलदार किरण जमदाडे यांनी सांगितले. अप्पर तहसील कार्यालय मंद्रुपकडे 2750 लाभार्थी आहेत, यापैकी 1900 लाभार्थ्यांच्या खात्यावर रक्कम जमा झाली असून उर्वरित लाभार्थ्यांच्या बँक खात्यांच्या तांत्रिक अडचणीमुळे रक्कम जमा होणे बाकी आहे.15 गावातील अतिवृष्टीने, पुरामुळे बाधित झालेल्या नागरिकांना अन्नधान्यांचे किट, कपडे, चादरी आदी साहित्य देण्यात आल्याचे मंद्रूप अप्पर तहसील कार्यालयाचे तहसीलदार सुजित नरहरे यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड