सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार १२०० कोटी
सोलापूर, 8 ऑक्टोबर, (हिं.स.)। राज्य सरकारने पूरग्रस्त व अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींच्या मदतीचे पॅकेज जाहीर केले आहे. त्यात जिरायतीसाठी हेक्टरी साडेअठरा हजार रुपये, बागायतीसाठी ३२ हजार ५०० रुपये आणि हंगामी बागायतीसाठी २७ हजार र
सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार १२०० कोटी


सोलापूर, 8 ऑक्टोबर, (हिं.स.)। राज्य सरकारने पूरग्रस्त व अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींच्या मदतीचे पॅकेज जाहीर केले आहे. त्यात जिरायतीसाठी हेक्टरी साडेअठरा हजार रुपये, बागायतीसाठी ३२ हजार ५०० रुपये आणि हंगामी बागायतीसाठी २७ हजार रुपये हेक्टरी मिळणार आहेत. सप्टेंबरमध्ये जिल्ह्यातील चार लाख २९ हजार ६२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भरपाईपोटी अंदाजे १२०० कोटी रुपये मिळतील.

सप्टेंबरमधील अतिवृष्टीमुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या तूर, उडीद, सोयाबीन, कापूस, मका, ऊस, भाजीपाला, कांदा, फळपिके, बाजरी, पेरू, केळी, झेंडू, कडवळ, टोमॅटो, डाळिंब, द्राक्ष, काकडी, फुले, आंबा, भुईमूग, सूर्यफूल अशा पिकांचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील बार्शी, माढा, करमाळा, अक्कलकोट, मोहोळ या तालुक्यातील शेतकऱ्यांचे अन्य तालुक्यांच्या तुलनेत सर्वाधिक नुकसान झाले आहे.

दिवाळीपूर्वी मदत मिळेल, असे सरकारने जाहीर करत अतिवृष्टी व महापुरामुळे नुकसान झालेल्या महसूल मंडलांसाठी सरसकट मदत जाहीर केली आहे. तरीपण, पंचनाम्याचे अहवाल मागण्यात आल्याची माहिती कृषी विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. त्याचा पीकनिहाय व क्षेत्रनिहाय अहवाल पाठवला जाणार आहे. त्यानंतर कोणत्या शेतकऱ्याला किती मदत मिळेल? हे स्पष्ट होणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande