जळगाव : सोने घेऊन पळून जाण्यापूर्वीच कारागीराच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या
जळगाव, 8 ऑक्टोबर (हिं.स.) | शहरातील बालाजी पेठेतील लक्ष्मीनारायण ज्वेलर्सच्या दुकानाचे कुलुप तोडुन दुकानात शिरला. लाकडी ड्रॉवर तोडुन त्यातून १२४ ग्रॅम सोन्याची चोरी करुन कारागीराने पोबारा केला होता. हा मुद्देमाल घेऊन तो रेल्वे स्टेशनवरुन हैद्राबाद
जळगाव : सोने घेऊन पळून जाण्यापूर्वीच कारागीराच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या


जळगाव, 8 ऑक्टोबर (हिं.स.) | शहरातील बालाजी पेठेतील लक्ष्मीनारायण ज्वेलर्सच्या दुकानाचे कुलुप तोडुन दुकानात शिरला. लाकडी ड्रॉवर तोडुन त्यातून १२४ ग्रॅम सोन्याची चोरी करुन कारागीराने पोबारा केला होता. हा मुद्देमाल घेऊन तो रेल्वे स्टेशनवरुन हैद्राबाद येथे पळुन जाण्याच्या तयारीत होता. पोलिसांच्या पथकाने सापळा लावुन त्याला मुद्देमालासह ताब्यात घेतले.

बिस्वजीत बनेस्वर सासमल (रा. वार्ड नं.१०, जयनगर, पश्चिम मेदिनीपूर, पश्चिम बंगाल) असे या संशयित कारागीराचे नाव आहे. पोलीस अधीक्षक डॉ.म हेश्वर रेड्डी यांनी याद्दल शनिपेठ पोलिसांच्या पथकाचे कौतुक केले. शुक्रवारी (३ ऑक्टोबर) पहाटे लक्ष्मीनारायण ज्वेलर्समधुन संशयिताने १२४ ग्रॅम सोने एकुण किमत १३ लाख ९९ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला होता. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याचा तपासकामी वरीष्ठ अधिकाऱ्यांनी सुचित केले होते. त्यानुसार घटनेच्या दिवशी सीसीटीव्ही फुटेजवरुन संशयिताची पोलिसांनी खात्री केली. त्यानंतर संशयित कारागीराची माहिती घेतली असता त्याची पत्नी हैद्राबाद येथे वास्तव्यास आहे. त्यानुसार हैद्राबाद येथे जाण्यासाठी त्याने रेल्वे तिकीट बुक केल्याचे तांत्रिक विश्लेषणावरुन निष्पन्न झाले. तांत्रिक माहितीवरुन पथकाने सापळा रचला आणि संशयित कारागीर बिस्वजीत सासमल याला मुद्देमालासह ताब्यात घेतले. त्याच्याकडून १२४.०६ ग्रॅम सोने, एक १८ इंच लांबीची कात्री (कटावणी), एक लोखंडी पेन्सिस, एक एक्झाब्लेड ही चोरीसाठी वापरलेले साधने पोलिसांनी हस्तगत केली.

पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर, एपीआय साजिद मंसूरी, उपनिरीक्षक योगेश ढिकले, हवालदार अल्ताफ पठाण, हवालदार प्रदीप नन्नवरे, हवालदार योगेश जाधव, कॉन्सटेबल योगेश साबळे, कॉन्सटेबल निलेश घुगे, अमोल वंजारी, नवजीत चौधरी तसेच तांत्रिक विश्लेषण विभागातील कॉन्सटेबल गौरव पाटील यांनी ही कारवाई केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande