जळगाव, 8 ऑक्टोबर (हिं.स.)सुवर्ण नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जळगावच्या सराफा बाजारात तेजीचा झंझावात सुरू आहे. २२ कॅरेट सोने प्रति तोळा – ₹१,१२,२१०, २४ कॅरेट सोने प्रति तोळा – ₹१,२२,५००, चांदी प्रति किलो – ₹१,५३,५०० असे आजचे दर आहेत.मागील आठवड्याच्या तुलनेत सोन्याच्या दरात तब्बल ३,हजार पेक्षा जास्त वाढ झाली आहे. चांदीतसुद्धा अडीच हजारा पेक्षा अधिक वाढ झाली असून, तज्ज्ञांच्या मते दर १ लाख ५० हजार प्रति किलो या ऐतिहासिक आकड्याला पार करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मंगळवारी सकाळी बाजार उघडताच २४ कॅरेट सोन्याचे दर जीएसटीसह प्रति १० ग्रॅम ८२४ रुपयांनी वाढून १ लाख २४ हजार ६३० रुपयांच्या ऐतिहासिक उच्चांकावर पोहोचले. तर चांदीनेही कमाल गाठली असून, जीएसटीसह प्रति किलो १ लाख ५६ हजार ५६० रुपयांचा नवीन उच्चांक केला. गेल्या सहा दिवसांत सोन्यात २८०० रुपये आणि चांदीत ३०९० रुपयांची वाढ झाली असून, दिवाळी व लग्नसराईच्या पार्श्वभूमीवर खरेदीचा उत्साह दिसत आहे एक तारखेला सोन्याचे दर जीएसटीसह प्रति १० ग्रॅम १ लाख २३ हजार ८०६ रुपये होते. मंगळवारी सकाळी बाजार सुरू होताच ८२४ रुपयांची वाढ नोंदवली गेली. यामुळे सोन्याने १ लाख २४ हजार ६३० रुपयांचा नवीन उच्चांक गाठला. गेल्या महिनाभरात सोन्याचे दर प्रति तोळा १३ हजार रुपयांनी वाढले आहेत.
जळगावमधील सराफा व्यापारी सांगतात की, अमेरिकेतील शटडाऊनचे सावट आणि जागतिक बाजारातील अनिश्चिततेमुळे गुंतवणूकदार सुरक्षित पर्याय म्हणून सोन्याकडे वळले आहेत. चांदीनेही बाजारात धडाकेबाज प्रवेश केला आहे. सोमवारी जीएसटीसह प्रति किलो १ लाख ५५ हजार ५०० रुपये होते, तर मंगळवारी सकाळी १०३० रुपयांची वाढ होत एक लाख ५६ हजार ५६० रुपयांचा उच्चांक गाठला. एक तारखेला चांदीचे दर १ लाख ५३ हजार ४७० रुपये होते. गेल्या महिनाभरात चांदीत २६ हजार रुपयांची वाढ झाली असून, तिची चमक सोन्याला साजेशी आहे. व्यापाऱ्यांच्या मते, दिवाळीपूर्वी चांदीचे दर दीड लाखाच्या पुढे जाण्याची शक्यता आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर